धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 09 फेब्रुवारी : ठाण्यातील 20 वर्षाच्या एका तरुणाने सर्वसामान्य रुग्णांना दिलासा देण्यासाठी तीन वर्षांपूर्वी सुरू केलेला व्यवसाय आता संपूर्ण देशभरात पोहोचला आहे. ठाण्यात राहणाऱ्या या तरुणाची चर्चा संपूर्ण जगभर होत आहे. हा विषय मेडिकल क्षेत्राशी निगडित असून देशभरात 2 हजार पेक्षा अधिक शाखा त्याने बनविल्या आहेत. अर्जुन देशपांडे असे या तरुणाचं नाव असून उद्योजक रतन टाटा यांनी सुद्धा त्याच्या व्यवसायात गुंतवणूक केली आहे.
औषधे कमी दरात
जेनरिक आधार ही एक औषधांची विक्री करणारी कंपनी आहे. अर्जुनने ही कंपनी वयाच्या 16 व्या वर्षी स्थापन केली. कंपनी उत्पादकांकडून थेट औषधांची खरेदी करते आणि ग्राहकांना विकते. कोरोना काळात अर्जुनने अनेक गरजूंना स्वस्तात औषधी पुरवली आहेत. रतन टाटा यांनी देखील जेनरिक आधारचे आर्थिक तसेच नैतिक समर्थन केले आहे. जेनरिक आधार मुळे लोकांना रोजगाराची संधी देखील मिळाली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक पेन्शनवर जगणाऱ्या लोकांना औषधे कमीत कमी किंमतीमध्ये मिळावी तसेच भारतातील 60 टक्के लोकांना औषधे परवडत नसल्यामुळे विकत घेता येत नाहीत. पण 85 ते 90 टक्के औषधेही भारतातच बनतात ही जेनरिक औषधे आहेत. त्यामुळे जेनरिक औषधे कमी दरात उपलब्ध करण्याचा अर्जुन देशपांडे याचा जेनरिक आधारच्या माध्यमातून प्रयत्न आहे.
कशी झाली सुरुवात?
मेडिकल स्टोरमध्ये उधारीवर औषध मागणारे आजोबांना पाहून अर्जुन देशपांडे हा युवक प्रेरित झाला. औषध क्षेत्रात असलेल्या अनेक भारताबाहेरील कंपन्या भारतात हजारो कोटींचा व्यवसाय करत आहेत. त्यामुळे भारतातील पैसा भारताच्या बाहेर जात आहे. म्हणून सर्वसामान्य रुग्णांना दिलासा देण्यासाठी अर्जुन देशपांडे याने जेनरिक आधार या नावाने स्वतः औषध विक्रीचा व्यवसाय सुरू केला.
Success Story : स्पर्धा परीक्षेचा नाद सोडला आणि आयुष्यात चहानं आणला गोडवा! पाहा Video
व्यवसाय 500 कोटींपर्यंत पोहोचला
हा व्यवसाय आता 500 कोटींपर्यंत पोहोचला आहे. ही औषधे घेणाऱ्या लाखो रुग्णांना स्वस्त औषधे मिळाल्याने फायदा झाला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देखील या संकल्पनेचे कौतुक करण्यात आले आहे. त्याचबरोबर अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांची चर्चा केल्यानंतर ते देखील सकारात्मक असल्याचं अर्जुन याने सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.