नवी दिल्ली 18 एप्रिल: एप्रिलमध्ये होणारी जेईई मेन (JEE Main) कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याचा (JEE Main April Session Postponed) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जेईई मेन परीक्षा 27 ते 30 एप्रिलदरम्यान होणार होती. मात्र, ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती. अशात आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे लक्ष देत ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीनं (NTA) याबाबतचा निर्णय घेतला आहे.
एनटीएनं म्हटलं, की कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहाता उमेदवार आणि अधिकाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेता एप्रिलमध्ये होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, की कोरोनाची सध्याची स्थिती पाहाता मी NTA ला JEE (Main) – 2021 चं एप्रिलमधील सत्र पुढे ढकलण्याचा सल्ला दिला होता. आपले विद्यार्थी आणि त्यांच्या शैक्षणिक करिअरबद्दल शिक्षण मंत्रालय आणि मला काळजी आहे.
📢 Announcement Given the current #covid19 situation, I have advised @DG_NTA to postpone the JEE (Main) – 2021 April Session.
I would like to reiterate that safety of our students & their academic career are @EduMinOfIndia's and my prime concerns right now. pic.twitter.com/Pe3qC2hy8T — Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) April 18, 2021
पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांच्या नव्या तारखेबद्दल विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पंधरा दिवस आधी माहिती देण्यात येईल. अधिक अपडेटसाठी विद्यार्थ्यांनी NTA ची अधिकृत वेबसाईट तपासत राहाणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Covid-19, Exam, India, Offline exams, Postponement