मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Explainer : ओमिक्रॉन विषाणूमुळे भारतात तिसरी लाट येऊ शकते का? ब्रिटनमधील संशोधनात धक्कादायक माहिती

Explainer : ओमिक्रॉन विषाणूमुळे भारतात तिसरी लाट येऊ शकते का? ब्रिटनमधील संशोधनात धक्कादायक माहिती

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हॅरिएंटने ब्रिटनमध्ये पहिला मृत्यू झाला आहे. योग्य प्रकारे काळजी घेतली नाही तर ब्रिटनमध्ये (UK) येत्या एप्रिलपर्यंत 25 हजार ते 75 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो, असा अंदाज ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतल्या शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधनानंतर वर्तवण्यात आला आहे. ब्रिटनसह युरोपातल्या अनेक देशांमध्ये सध्या पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. भारतातली परिस्थिती नियंत्रणात असली, तरीही आठ राज्यांत ओमिक्रॉनने प्रवेश केला आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 14 डिसेंबर : कोरोना विषाणूचा (Corona) संसर्ग आटोक्यात येतोय म्हणता म्हणता ओमिक्रॉन व्हॅरिएंट (Omicron Variant) आला आणि परिस्थिती पुन्हा आवाक्याबाहेर जातेय की काय, अशी भीती निर्माण होऊ लागली आहे. ओमिक्रॉन व्हॅरिएंट फारसा घातक नाही; मात्र त्याचा संसर्ग पसरण्याचा वेग जास्त आहे, असं प्राथमिक अभ्यासात आढळलं आहे. त्यातच, योग्य प्रकारे काळजी घेतली नाही तर ब्रिटनमध्ये (UK) येत्या एप्रिलपर्यंत 25 हजार ते 75 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो, असा अंदाज ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतल्या शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधनानंतर वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे भीती अधिकच वाढली आहे. ब्रिटनसह युरोपातल्या अनेक देशांमध्ये सध्या पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. भारतातली परिस्थिती नियंत्रणात असली, तरीही आठ राज्यांत ओमिक्रॉनने प्रवेश केला आहे.

भारतातली परिस्थिती

12 डिसेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भारतात 38 ओमिक्रॉनबाधित आहेत. महाराष्ट्रात 18, गुजरात आणि कर्नाटकात प्रत्येकी 3, दिल्लीत 2, राजस्थानात 9, तर केरळ, आंध्र प्रदेश आणि चंडीगडमध्ये प्रत्येकी एक ओमिक्रॉनबाधित सापडला आहे. भारतात 12 डिसेंबर रोजी 7350 नवे कोरोनाबाधित आढळले. 11 डिसेंबरच्या तुलनेत हा आकडा 5.45 टक्क्यांनी कमी आहे. सध्या सर्वांत जास्त नवे कोरोनाबाधित केरळ, महाराष्ट्र, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक या राज्यांमध्ये आढळत आहेत; पण ब्रिटन आणि अन्य युरोपीय देशांतली परिस्थिती पाहता भारतातली परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे, असं वाटू शकतं.

लसीकरण पथकाला पाहून पळाली महिला; जबरदस्तीने दिली लस, ढसाढसा रडतानाचा VIDEO

युरोपातली परिस्थिती

जगभरात आढळणाऱ्या दर 100 कोरोनाबाधितांपैकी 64 कोरोनाबाधित एकट्या युरोपातले (Europe) असतात. दर तीन दिवसांत युरोपात जवळपास 10 लाख नवे कोरोनाबाधित आढळत आहेत. मोनॅको, फिनलँड, फ्रान्स, डेन्मार्क अशा युरोपातल्या सात देशांमध्ये नव्याने आढळणारी रुग्णसंख्या सर्वोच्च पातळीवर आहे. युरोपातल्या रुग्णसंख्येची सात दिवसांची सरासरीदेखील आतापर्यंतच्या सर्वाधिक पातळीवर आहे.

जर्मनीमध्ये नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यानंतर कोरोना रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तिथे दररोज सरासरी 58 हजार नवे रुग्ण आढळत होते. ती संख्या आता घटून 50 हजारांच्या आसपास आली आहे.

फ्रान्समध्ये दररोज 48 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत. गेल्या वर्षी 7 नोव्हेंबरपासूनची ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.

दुसरा डोस न घेतल्यास महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात नागरिकांना होणार 500रुपये दंड

पोलंडमध्ये नव्या रुग्णसंख्येसोबतच मृतांचं प्रमाणही वाढत आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून या देशात दररोज सुमारे 120 किंवा त्याहून जास्त मृत्यू होत आहेत. दररोज सुमारे 22 हजार नवे रुग्ण आढळत आहेत. ही संख्या एप्रिलनंतरची सर्वाधिक आहे.

ब्रिटनमधली परिस्थिती

ब्रिटनमध्ये (UK) ओमिक्रॉन व्हॅरिएंटचा संसर्ग झालेले तीन हजारांहून अधिक रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. ब्रिटनने कोरोनासाठीची धोका पातळी तीनवरून चारवर करत असल्याचं 12 डिसेंबर रोजी जाहीर केलं. यापूर्वी मे महिन्यात धोका पातळी चारवर असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. कोरोनाचा संसर्ग जास्त वेगाने होत आहे, असा याचा अर्थ आहे.

अशा प्रकारे रुग्णसंख्या वाढत राहिली, तर ब्रिटनमधल्या आरोग्य सेवांवर तीव्र ताण येईल, असा इशारा आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे. कोरोनामुळे ब्रिटनमध्ये अन्य सर्वसाधारण आजारांवर उपचार करून घेण्यासाठी 50 लाखांहून अधिक जण वेटिंग लिस्टमध्ये आहेत. 18 वर्षांवरच्या सर्वांना जानेवारीअखेरपर्यंत कोरोनाप्रतिबंधक लशीचा बूस्टर डोस देण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं होतं. आता वाढलेला धोका पाहून ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी डिसेंबर अखेरपर्यंतची मुदत ठरवून घेतली आहे.

ब्रिटनबद्दलच्या ओमिक्रॉनविषयीच्या संशोधनातून नेमकं काय समोर आलं?

लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीन आणि स्टेलेनबोश युनिव्हर्सिटी या दोन संस्थांमधल्या शास्त्रज्ञांनी अलीकडेच एक संशोधन केलं. त्यात त्यांनी चार वेगवेगळ्या परिस्थितींची कल्पना करून, त्यात संशोधन करून काही निष्कर्ष काढले.

चिंता वाढली..! Omicron चा गड ठरणार महाराष्ट्र?, निम्म्याहून अधिक रुग्ण राज्यातच

1. ओमिक्रॉनवर लस प्रभावी ठरत आहे आणि बूस्टर डोसही प्रभावी ठरतोय असं आढळलं, तरीही जानेवारी 2021 च्या तुलनेत हॉस्पिटलायझेशनच्या दरामध्ये 60 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. तशी परिस्थिती आली तर दररोज 3750 जणांना हॉस्पिटलाइझ करावं लागेल.

2. सर्वांत वाईट परिस्थिती अशी असू शकते, की ओमिक्रॉनवर लस आणि बूस्टर डोसही प्रभावी ठरत नाहीये, असं आढळेल. अशी परिस्थिती आली, तर दररोज 7100 हून अधिक रुग्ण आढळू शकतील.

3. लस (Vaccine) ओमिक्रॉनवर प्रभावी असेल, परंतु बूस्टर डोस प्रभावी नसेल, अशी परिस्थिती उद्भवली, तरीही दररोज 4350 जणांना हॉस्पिटलाइझ करावं लागू शकेल.

4. लस प्रभावी नसेल, परंतु बूस्टर डोस (Bosster Dose) प्रभावी असेल, तर दररोज 4500 जणांना हॉस्पिटलाइझ करावं लागेल.

योग्य प्रकारे काळजी घेतली नाही, तर ओमिक्रॉनमुळे एप्रिल 2022 पर्यंत ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनमुळे 25 हजार ते 75 हजार मृत्यू होऊ शकतात, अशी भीती शास्त्रज्ञांनी या संशोधनाअंती व्यक्त केली आहे. त्यामुळे ब्रिटनला तर काळजी घ्यायलाच हवी आहे; पण भारतासह अन्य देशांनीही योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे, असं यातून दिसून आलं आहे.

First published:

Tags: Corona, Corona spread, Corona updates