पुलवामा, 29 ऑगस्ट : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत सुरक्षा दलाकडून 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री 1 वाजल्यापासून पोलीस आणि सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. या चकमकीत एक जवान जखमी झाला आहे. या जवानाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आणि सुरक्षा दलाला जदुरा परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली. यावेळी एका ठिकाणी संशयास्पद हालचाली दिसल्यानं सुरक्षा दलानं परिसराला घेराव घालून सरेंडर करण्याचं आवाहन केलं मात्र दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.
#BreakingNews
— News18 India (@News18India) August 29, 2020
पुलवामा में सुरक्षा बल ने तीन आतंकी मार गिराए #JammuAndKashmir #Pulwama #news #News18india @rifatabdullahh pic.twitter.com/DXPh9RueHH
हे वाचा- ‘चांद्रयान-3’साठी बंगळुरुजवळ तयार होणार चंद्रासारखे खड्डे, ISROचा प्लान तयार! काश्मीरमध्ये 24 तासांत सुरक्षा दलानं मोठी कारवाई केली आहे. शोपियानं इथे शुक्रवारी सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा कऱण्यात आला होता.काश्मीर पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिेलेल्या माहितीनुसार शुक्रवारी शोपियांच्या किल्लोर भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. शनिवारी पुन्हा एकदा चकमक झाल्यानं 24 तासांत दुसरी चकमक असल्याचं सांगितलं जात आहे. शुक्रवारी झालेल्या चकमकीत चार अतिरेकी ठार झाले, तर एकाला पकडण्यात यश आलं.