श्रीनगर, 30 जुलै: जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir)मध्ये पुन्हा एकदा संशय़ास्पद ड्रोन (Drone activity suspected) दिसले आहेत. जम्मू-काश्मीरमधील सांबा (Samba) जिल्ह्यात गुरुवारी रात्री तीन ठिकाणी हे संशयास्पद ड्रोन दिसून आले. रात्री 8.30 ते 9.30 वाजण्याच्या सुमारास हे संशयास्पद ड्रोन दिसून आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बारी-ब्राह्मण, चिलाद्या आणि गगवाल परिसरात एका तासाभरात हे ड्रोन दिसून आले. यापैकी दोन आर्मी कॅम्प आणि आयटीबीपी कॅपच्या जवळ दिसून आले. संशयास्पद ड्रोन दिसून आल्यावर बीएसएफ (BSF) ने गोळीबार केला त्यानंतर हे तिन्ही ड्रोन गायब झाले.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी ड्रोन भारतीय सैन्याने पाडलं होतं. त्यानंतर आता पुन्हा संशयास्पद ड्रोन दिसून आल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. ड्रोन दिसल्यावर बीएसएफ जवानांनी गोळीबार करताच ते गायब झाले. यानंतर सुरक्षा दलाकडून आसपासच्या परिसरात सर्च ऑपरेशन सुद्धा घेतलं.
Jammu & Kashmir | Some unidentified lights were seen in the sky near the international border in the Samba sector. Few rounds were fired on it and the lights disappeared: Border Security Force (BSF)
— ANI (@ANI) July 30, 2021
मराठी अभिनेत्रीकडे कास्टिंगच्या नावाखाली शरीरसुखाची मागणी; मनसेने चौघांना पकडून धू-धू धुतलं
काही दिवसांपूर्वी येथील सीमावर्ती भागात कांचक परिसरात पोलिसांनी पाच किलो आयईडी सामग्री घेऊन जाणाऱ्या एका पाकिस्तानी ड्रोनला पाडलं होतं. बीएसएफ जवानांनी पाकिस्तानात परतणाऱ्या ड्रोनवर गोळ्या झाडल्या आणि ते खाली पाडलं होतं.
ड्रोन व्यतिरिक्त एलओसी जवळ पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स लिहिलेला एक फुगा सुरक्षा यंत्रणांना काही दिवसांपूर्वी दिसून आला होता. या फुग्यावर पाकिस्तानचा झेंडा सुद्धा होता. जम्मू-काश्मीरमध्ये 27 जून रोजी भारतीय हवाई दलाच्या तळावर ड्रोन हल्ल्याचा वापर केल्याचं समोर आलं होतं आणि त्यानंतर आता वारंवार ड्रोन या परिसरात दिसून येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BSF, Drone shooting, India, Jammu and kashmir, Pakistan