मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मराठी अभिनेत्रीकडे कास्टिंगच्या नावाखाली शरीरसुखाची मागणी; मनसेने चौघांना पकडून धू-धू धुतलं

मराठी अभिनेत्रीकडे कास्टिंगच्या नावाखाली शरीरसुखाची मागणी; मनसेने चौघांना पकडून धू-धू धुतलं

सिनेमात काम देण्यासाठी अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी; मनसेने आरोपींना पकडून चोपलं.

सिनेमात काम देण्यासाठी अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी; मनसेने आरोपींना पकडून चोपलं.

सिनेमात काम देण्यासाठी अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी; मनसेने आरोपींना पकडून चोपलं.

ठाणे, 30 जुलै: कास्टिंग काऊचचं (Casting Couch) एक प्रकरण पुन्हा एकदा समोर आलं आहे. बॉलिवूडमध्ये असे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. आता एका मराठी अभिनेत्रीला (Marathi Actress) सिनेमात भूमिका (Role in movie) देण्यासाठी शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सतर्क झालेल्या अभिनेत्रीने मनसे चित्रपट सेनेसोबत संपर्क साधला. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आरोपींना पकडून चांगलेच बदडले.

मनसेचे अमेय खोपकर यांनी या प्रकरणाचे व्हिडीओ आपल्या फेसबूक पोस्टमध्ये पोस्ट केले आहेत. यासोबतच संपूर्ण प्रकरण काय आहे याची सुद्धा माहिती दिली आहे. अमेय खोपकर यांनी सांगितले की, मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष पद्मनाभ राणे यांना एका अभिनेत्रीने फोन केला आणि सांगितले की एका कास्टिंग डायरेक्टरने मला फोन केला होता. तुला एका हिंदी सिनेमात कास्ट केलं आहे आणि जर तुला मुख्य भूमिका हवी असेल तर उद्या प्रोड्युसर लखनऊ येथून मुंबईत येणार आहेत. त्यांना तुला खूश करावे लागेल मग तुला मुख्य भूमिका मिळेल.

" isDesktop="true" id="585920" >

यानंतर अभिनेत्रीने हिंमत दाखवत मनसे चित्रपट सेनेला संपर्क साधला. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एका फार्महाऊसवर ही अभिनेत्री आरोपींसोबत गेली त्यावेळी मनसेचे पदाधिकारी त्यांच्या मागावर होते. आरोपींना यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले आहे अशी माहिती अमेय खोपकर यांनी दिली.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी आरोपी गिरिजेश यादव, बिरालाल यादव, राहुल यादव आणि कंचन यादव या चौघांना पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. यापूर्वी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या आरोपींची चांगलीच धुलाई सुद्धा केली आणि त्याचे व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत आहेत.

First published:
top videos

    Tags: Casting couch, Marathi actress, Marathi cinema, MNS