Home /News /national /

Jammu Kashmir: बुरखा घालून दारुच्या दुकानात पोहोचले दहशतवादी, अन् फेकला हँडग्रेनेड; एकाचा मृत्यू, तीन जखमी

Jammu Kashmir: बुरखा घालून दारुच्या दुकानात पोहोचले दहशतवादी, अन् फेकला हँडग्रेनेड; एकाचा मृत्यू, तीन जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) दहशतवाद्यांनी (Terrorists) पुन्हा एकदा हल्ला केला आहे.

    श्रीनगर, 18 मे: Baramulla Grenade Attack: जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) दहशतवाद्यांनी (Terrorists) पुन्हा एकदा हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी बारामुल्ला (Baramulla) येथील एका वाईन शॉपवर हँडग्रेनेडने (Hand Grenade) हल्ला केला ज्यात 4 कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यानंतर उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे काही दिवसांपूर्वी उघडलेल्या दारूच्या दुकानावर (liquor store) दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. हल्लेखोर दारू खरेदीदार असल्याचं भासवून दुकानात आले आणि त्यांनी ग्रेनेड फेकले. रात्री साडेआठ वाजता कोर्ट रोडवर असलेल्या एका दारूच्या दुकानावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकल्याने चार जण जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. संभाजीराजेंना भाजपकडून अडथळा? केतकी चितळेला कोर्टात हजर करणार, मुंबईत मान्सून लवकरच येणार TOP बातम्या पुढे त्यांनी सांगितलं की, जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले जेथे रणजीत सिंग मृत्यू झाला. पोलीस प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, हे चार जण दुकानातील कामगार होते आणि ते जम्मू विभागातील रहिवासी होते. जखमी गोवर्धन सिंग, गोविंद सिंग आणि रवी कुमार यांच्यावर उपचार सुरू आहेत. बुरखा घातलेल्या दहशतवाद्याने फेकले ग्रेनेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामुल्ला येथील दिवाणबागमध्ये दारूचे नवीन दुकान सुरू झालं आहे. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास दोन दुचाकीस्वार दहशतवादी या दुकानाबाहेर येऊन थांबले. बुरखा घातलेला एक दहशतवादी दारूच्या दुकानात पोहोचला आणि खिडकीत हात घालून हातबॉम्ब टाकला. यानंतर दोन्ही दहशतवादी दुचाकीवर बसून तेथून पळून गेले. लश्कर-ए-तैयबाशी संलग्न दहशतवादी संघटना रेझिस्टन्स फोर्स (टीआरएफ) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या घटनेनंतर लगेचच सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दहशतवाद्यांच्या शोधात ऑपरेशन सुरू केले मात्र त्यांचा सुगावा लागू शकला नाही. सध्या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी बारामुल्ला घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, 'मी बारामुल्ला येथील दिवाण बाग येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. रणजित सिंग यांच्या कुटुंबाप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. या भीषण दहशतवादी हल्ल्यातील दोषींना शिक्षा होईल.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Jammu and kashmir, Terrorist attack

    पुढील बातम्या