आर्थिक राजधानी आहे रानटी जनावरांचं शहर, तुम्ही कल्पनाही नाही करणार अशी मुंबईची 'वाईल्ड लाईफ'

आर्थिक राजधानी आहे रानटी जनावरांचं शहर, तुम्ही कल्पनाही नाही करणार अशी मुंबईची 'वाईल्ड लाईफ'

19 मार्च ते 26 मार्च 2020 या कालावधीत राजस्थानातील जयपूर येथे अकरावी 'वाइल्ड काँग्रेस' भरवण्यात खाली आहे. ज्यामध्ये दीडशेच्या जवळपास देश सहभागी होणार आहेत

  • Share this:

मुंबई, 22 जानेवारी : सव्वा कोटी लोकसंख्येच्या मुंबईत माणसांबरोबरच कितीतरी हजार किंवा त्याहून अधिक रानटी पशु, जीवजंतू राहतात. ते आपल्या आसपास आहेत पण त्यांच्यातली जैवविविधता आपल्याला जाणवत नाही. म्हणूनच मुंबई ही कशी 'वाइल्ड सिटी' आहे हे दाखवण्याचा प्रयत्न वीर जिजामाता उद्यानाच्यावतीने करण्यात आला आहे. 19 मार्च ते 26 मार्च 2020 या कालावधीत राजस्थानातील जयपूर येथे अकरावी 'वाइल्ड काँग्रेस' भरवण्यात खाली आहे. ज्यामध्ये दीडशेच्या जवळपास देश सहभागी होणार आहेत. हे प्रत्येक देश आपआपल्या भागातील पशुपक्षी जैवविविधता याबाबतची माहिती देणार आहेत.

सोबतच त्या त्या भागातील जैवविविधता नष्ट होण्यासाठी कारणीभूत ठरणारे मोठे धोके हेसुद्धा या कॉन्फरन्स मध्ये मांडले जाणार आहेत. मुख्य म्हणजे याच कॉन्फरन्स साठी मुंबई वाईल्ड सिटी चित्रफीत तयार करण्यात आली आहे. 45 मिनिटांच्या या चित्रफितीवर आधारित पोस्टर्स, छोट्या क्लिप्स या काँग्रेसमध्ये दाखवण्यात येणार आहे. अगदी तोच सेट मुंबईच्या जिजामाता उद्यानात पहिल्या माळ्यावर उभारण्यात येणार आहे. जेणेकरून मुंबईकरांना त्यांच्या आसपास असलेल्या वन्यजीवांची पशुपक्ष्यांची कीटकांची माहिती आणि महत्त्व कळेल. परंतु मार्चमध्ये होणाऱ्या या काँग्रेसनंतर हे प्रदर्शन मुंबईत आणून कायमस्वरूपी लावण्यासाठी किमान महिन्याचा अवधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे वीर जिजामाता उद्यानातील नव्या काही पिंजरे आणि त्यातील प्राणी यांच्यासह या गॅलरीचे उद्घाटन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तोपर्यंत राणीच्या बागेत नवे वाघ आणि सिंह येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या या शॉर्ट फिल्ममध्ये अरेच्या भागात वन्य जीवांचं वास्तव असल्याचे दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे आरे हे जंगल असल्याचं मुंबई महापालिकेने मान्य केल्याचं दिसून येतंय. या चित्रफिती मध्ये केवळ मुंबई नाही तर मुंबईच्या आसपासचा म्हणजेच MR रिजन ही दर्शविण्यात आला आहे.  येत्या काळात कर्नाटक राज्याने ज्याप्रमाणे स्वतःला वन्यजीव राज्य दाखवले आहे त्याच धर्तीवर मुंबई शहर स्वतःला वन्यजीव शहर म्हणून पुढे आणू पाहात आहे.

First published: January 22, 2020, 12:23 PM IST

ताज्या बातम्या