पुलवामा, 07 जुलै : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील गुस्को भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांच्या दरम्यान एनकाउंटर सुरू आहे. सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांना घेराव घातला असून बर्याच काळापासून गोळीबार सुरू आहे. गुसो सेक्टरमध्ये दहशतवादी अडकल्याची शक्यता आहे. आतापर्यंत या चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत. तर एका दहशतवाद्याला ठार मारण्यात जवानांना यश आलं आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता संपूर्ण परिसर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षा दलाला गुसो भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. माहिती अशी होती की दहशतवादी घरात लपून मोठा कट रचण्याची योजना तयार करीत आहेत. माहितीच्या आधारे सैन्याने स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफच्या गटासह एक टीम तयार केली आणि त्या परिसराला वेढा घालण्यास सुरवात केली.
An encounter has started at Goosu area of Pulwama. Police and security forces are carrying out the operation. Further details shall follow: Kashmir Zone Police #JammuAndKashmir (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/KQIYylNXaV
— ANI (@ANI) July 7, 2020
स्वत: ला वेढलेले पाहून दहशतवाद्यांनी घराच्या आतून गोळीबार सुरू केला. या घटनेत लष्कराचा एक जवान आणि जम्मू-काश्मीरचे एक पोलीस जखमी झाले आहेत. जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंतच्या वृत्तानुसार तीन दहशतवादी घरात लपून गोळीबार करीत आहेत. भारतीय सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. संपादन-प्रियांका गावडे.