जाहिरात
मराठी बातम्या / देश / Jammu Kashmir: काश्मीर खोऱ्यात चकमक; चार दहशतवाद्यांचा खात्मा तर एका दहशतवाद्याला अटक, भारतीय सैन्याची मोठी कामगिरी

Jammu Kashmir: काश्मीर खोऱ्यात चकमक; चार दहशतवाद्यांचा खात्मा तर एका दहशतवाद्याला अटक, भारतीय सैन्याची मोठी कामगिरी

भारतीय सैन्याची मोठी कामगिरी; काश्मीर खोऱ्यातील चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा तर एकाला अटक

भारतीय सैन्याची मोठी कामगिरी; काश्मीर खोऱ्यातील चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा तर एकाला अटक

Encounters in Jammu Kashmir: शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात एका सरपंचाची गोळ्या झाडून दहशतवाद्यांनी हत्या केली होती. यानंतर भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये विविध ठिकाणी चकमक झाल्या असून चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

श्रीनगर, 12 मार्च : जम्मू आणि काश्मीर **(Jammu and Kashmir)**मध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा (4 terrorist killed in encounter) करण्यात आला आहे. चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी दोन लष्कर ए तैयबाचे तर दोन दहशतवादी हे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांचे असल्याची माहिती समोर आली आहे. पुलवामा येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे तर हंदवाडा येथे एका दहशतवाद्याचा आणि गांदरबल येथे एका दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे. तर एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले आहे. काश्मीर पोलिसांनी या संदर्भात माहिती दिली आहे. काश्मीरचे पोलीस अधिकारी विजय कुमार यांनी सांगितले की, पुलवामा येथे झालेल्या चकमकीत पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी मारले गेले. अद्यापही या परिसरात दोन दहशतवादी आहेत आणि भारतीय सैन्याची या दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे. पुलवामाच्या चेवाकलां परिसरात शुक्रवारी सायंकाळी सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली होती.

जाहिरात

हंदवाडा येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास रजवाडा क्षेत्रातील नेचामा येथे चकमक सुरू झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. या संदर्भात जम्मू-काश्मीर पोलिसांनी माहिती देताना सांगितले, गांदरबल येथे झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले आहे. गांदरबलच्या सेराच परिसरात अद्यापही चकमक सुरू आहे. वाचा :  लष्कराचं हेलिकॉप्टर Crash, पायलटचा शोध सुरू शुक्रवारी कुलगाम जिल्ह्यातील औडोरा परिसरात एका सरपंचाची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या सरपंचाचे नाव शब्बीर अहमद मीर असे असल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारानंतर सरपंचाला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. काश्मीर पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट केले की, गांदरबलच्या सेराच भागात चकमक सुरू झाली. पोलीस आणि सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. अद्यापही ही चकमक सुरू आहे. यापूर्वी पुलवामा येथे झालेल्या चकमकीत एका दहशतवाचा खात्मा करण्यात आला होता. पुलवामा येथे शुक्रवारी झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचा पाकिस्तानी दहशतवादी ठार झाल्याच्या वृत्ताला काश्मीर पोलिसांनी दुजोरा दिला आहे. पुलवामा येथे अद्यापही चकमक सुरू असल्याचंही पोलिसांनी सांगितले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात