मराठी बातम्या /बातम्या /देश /

Jammu Kashmir Tunnel Collapsed: महामार्गावर निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळला, 6-7 लोक ढिगाऱ्याखाली अडकले

Jammu Kashmir Tunnel Collapsed: महामार्गावर निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळला, 6-7 लोक ढिगाऱ्याखाली अडकले

Jammu Kashmir Tunnel Collapsed: एका बांधकामाधीन चार-लेन बोगद्याचा एक भाग गुरुवारी रात्री कोसळला. त्यात नऊ लोक अडकले, त्यापैकी दोन जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

  • Published by:  Pooja Vichare

श्रीनगर, 20 मे: Jammu Kashmir Tunnel Collapsed: रामबन जिल्ह्यातील (Ramban District) जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील (Jammu-Srinagar National Highway) एका बांधकामाधीन चार-लेन बोगद्याचा एक भाग गुरुवारी रात्री कोसळला. त्यात नऊ लोक अडकले, त्यापैकी दोन जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

एजन्सीच्या म्हणण्यानुसार, खूनी नाल्यातील बोगद्याच्या पुढील बाजूचा एक छोटासा भाग ऑडिट दरम्यान कोसळल्यानंतर, पोलीस आणि लष्कराने तातडीने संयुक्त बचाव मोहीम सुरू केलं.

ऑडिटिंग कंपनीचे कर्मचारी अडकले

अधिकाऱ्यांनी सांगितले की, बचाव मोहिमेदरम्यान दोन जणांची सुटका करण्यात आली असून सात जण अजूनही बोगद्यात अडकले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बोगद्यात अडकलेले लोक बोगद्याचं ऑडिट करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी आहेत. बनिहालहून घटनास्थळी अनेक रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मदत आणि बचाव कार्य सुरूच

रामबन जिल्ह्याचे उपायुक्त म्हणाले, "रामबनच्या मेकरकोट भागात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील खूनी नाल्यावर बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा एक भाग कोसळला. ढिगाऱ्याखाली सहा ते सात जण गाडले गेले. एकाला वाचवण्यात यश आले आणि मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी

रामबन जिल्ह्याचे उपायुक्त मसरतुल इस्लाम आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक मोहिता शर्मा घटनास्थळी आहेत आणि बचाव कार्यावर देखरेख करत आहेत. निनाहीन बोगद्यात झालेल्या अपघातामुळे बचाव मोहिमेमुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे.

ढिगाऱ्याखाली अनेक वाहने आणि मशिन गाडले

बांधकामाशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा बोगद्यासमोर बुलडोझर आणि ट्रकसह अनेक मशिन आणि वाहने उभी होती. बोगदा कोसळल्याने त्यांचेही पूर्ण नुकसान झाले आहे. रामबनचे उपायुक्त मसरतुल इस्लाम आणि एसएसपी मोहिता शर्मा बोगद्यात सुरू असलेल्या बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत.

First published:

Tags: Jammu and kashmir, Jammu kashmir