जाहिरात
मराठी बातम्या / देश / Jammu and Kashmir: रात्रभर चाललेल्या चकमकीत हिज्बुलचा दहशतवादी ठार, 3 जवानही जखमी

Jammu and Kashmir: रात्रभर चाललेल्या चकमकीत हिज्बुलचा दहशतवादी ठार, 3 जवानही जखमी

Jammu and Kashmir: रात्रभर चाललेल्या चकमकीत हिज्बुलचा दहशतवादी ठार, 3 जवानही जखमी

अनंतनाग जिल्ह्यात (Anantnag District) रात्रभर झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीनचा (Hizbul Mujahideen Militant) एक दहशतवादी मारला गेला.

  • -MIN READ
  • Last Updated :

श्रीनगर, 04 जून: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) अनंतनाग जिल्ह्यात (Anantnag District) रात्रभर झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीनचा (Hizbul Mujahideen Militant) एक दहशतवादी मारला गेला. या चकमकीत तीन जवान आणि एक नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे. काश्मीर झोनच्या पोलिसांनी (Kashmir zone police) शनिवारी ही माहिती दिली. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार म्हणाले, प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचा दहशतवादी कमांडर एचएम निसार खांडे ठार झाला. घटनास्थळावरून एके 47 रायफलसह अतिरेकी साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. कारवाई अद्याप सुरू आहे.

जाहिरात

पोलीस प्रवक्त्याने सांगितले की, अनंतनागच्या ऋषीपोरा भागात शुक्रवारी संध्याकाळी चकमक सुरू झाली. त्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांसोबत झालेल्या गोळीबारात तीन सैनिक आणि एक नागरिक जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने श्रीनगरमधील 92 बेस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. शोपियानमध्ये परप्रांतीय मजुरांवर ग्रेनेड हल्ला दक्षिण काश्मीरच्या (South Kashmir) शोपियानमध्ये (Shopian) दहशतवाद्यांनी स्थलांतरित मजुरांना लक्ष्य केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी (Terrorists) कामगारांवर ग्रेनेड फेकले. यामध्ये दोन मजूर जखमी झाले आहेत. या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं मजूर जखमी झाल्याची माहिती सुरुवातीला समोर येत होती. मात्र पोलिसांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचं स्पष्ट केलं आहे. सिलिंडरचा स्फोट झाला नाही. Big News: विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियानच्या आगलार झैनापोरा भागात दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकला, ज्यामध्ये दोन प्रवासी मजूर जखमी झाले. परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. बडगाममध्ये दोन परप्रांतीय मजुरांवर गोळीबार, एकाचा मृत्यू गुरुवारी बडगाममध्ये (Budgam) वीटभट्टीवर काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांवर हल्ला झाला, ज्यामध्ये 1 कामगाराचा मृत्यू झाला. तर एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. जखमी मजुरावर श्रीनगरच्या SMHS रुग्णालयात (SMHS Hospital, Srinagar) उपचार सुरू आहेत. बडगाम मगरेपोरा चडूरा भागात दहशतवाद्यांनी मजुरांवर हल्ला केला. या हल्ल्यात प्राण गमावलेल्या मजुराचे नाव दिलखुश असल्याचे सांगण्यात येत आहे. तो बिहारचा रहिवासी होता. दुसरीकडे, राजन असे दुसऱ्या मजुराचे नाव असून, तो पंजाबचा रहिवासी आहे. काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गैर-काश्मिरी किंवा हिंदू नागरिकांची निवडक हत्या केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात