मराठी बातम्या /बातम्या /देश /Jammu-Kashmir: अनंतनाग चकमकीत एक दहशतवादी ठार, शोधमोहीम सुरूच

Jammu-Kashmir: अनंतनाग चकमकीत एक दहशतवादी ठार, शोधमोहीम सुरूच

जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा (Terrorist encounter) केला.

जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा (Terrorist encounter) केला.

जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा (Terrorist encounter) केला.

श्रीनगर, 24 डिसेंबर: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा (Terrorist encounter security forces Jammu Kashmir Anantnag) केला. काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली. ही चकमक अरवानी भागात सुरू झाली. ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख पटलेली नाही. घटनास्थळी पोलीस आणि सुरक्षा दल तैनात असून शोध मोहीम अजूनही सुरू आहे. असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांच्या उपस्थितीची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी जिल्ह्यातील अरवानी भागातील मुमनहाल गावाला वेढा घालून शोध मोहीम सुरू केली. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला, त्यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले आणि शोध मोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले. असल्याचे अधिकाऱ्याने म्हटले आहे.

रविवारी श्रीनगरच्या हरवान भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा एक पाकिस्तानी दहशतवादी मारला गेला.

बुधवारीच काश्मीर खोऱ्यात काही मिनिटांतच झालेल्या दोन वेगवेगळ्या दहशतवादी घटनांमध्ये एक नागरिक आणि एक पोलिस ठार झाला. एकीकडे, श्रीनगरमधील नवाकडलमध्ये दहशतवाद्यांनी एका नागरिकाची गोळ्या झाडून हत्या केली, तर दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहारा भागात झालेल्या हल्ल्यात एका सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "दहशतवाद्यांनी बुधवारी संध्याकाळी 5:55 वाजता श्रीनगरच्या नवाकडल भागात रौफ अहमद नावाच्या व्यक्तीला त्याच्या घराजवळ गोळ्या घातल्या, ज्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला येथील एसएमएचएस रुग्णालयात आणले असता तेथे त्याचा मृत्यू झाला.

घटनेनंतर काही वेळातच घडलेल्या घटनेत दहशतवाद्यांनी बिजबेहारा रुग्णालयाबाहेर पोलीस एएसआय मोहम्मद अश्रफ यांच्यावर गोळी झाडली, ज्यात ते जखमी झाले, असे अधिकाऱ्याने सांगितले. एएसआयला त्याच रुग्णालयात नेण्यात आले जिथून त्याला श्रीनगरमधील आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. मात्र, त्यांची मृत्यूची झुंज अपयशी ठरली.

First published:

Tags: Jammu and kashmir, Terror acttack, Terrorist