आयजीपी काश्मीर विजय कुमार म्हणाले की, दहशतवादी आमिर रियाज लेथपोरा हा दहशतवादी हल्ल्यातील एका आरोपीचा नातेवाईक होता. त्याला मुजाहिदीन गजवतुल हिंद या दहशतवादी संघटनेने फिदाईन हल्ला घडवून आणण्याचे काम सोपवले होते. क्रिकेटचा शौकिन होता आमिर ठार झालेला दहशतवादी आमिर रियाज हा क्रिकेटचा मोठा शौकिन होता. तो स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळायचा. त्याचे क्रिकेटच्या जर्शीतले फोटोही व्हायरल झालेत. क्रिकेटचा छंद सोडून रियाज दहशतवाद्याचा मार्गावर गेला. आज बेमिना दहशतवादी चकमकीत त्याचा लष्करानं खात्मा केला आहे. हेही वाचा- प्रचारासाठी पाण्यासारखा ओतला पैसा, BJP नं खर्च केलं कोट्यवधी रुपये कुलगाम चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एचएम शिराज मौलवी आणि यावर भट अशी त्यांची ओळख पटली आहे. शिराज 2016 पासून सक्रिय होता आणि निष्पाप तरुणांना दहशतवादी गटात भरती करण्यात आणि अनेक नागरिकांच्या हत्या करण्यात सहभागी होता. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितलं की, इतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे.#KulgamEncounterUpdate: 01 more unidentified #terrorist killed (Total 02). #Incriminating materials including arms and ammunition recovered. Search going on. Further details shall follow. @JmuKmrPolice https://t.co/UShDxwl67l
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) November 12, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jammu and kashmir, Terrorist