मराठी बातम्या /बातम्या /देश /पाच राज्यातल्या निवडणुकांच्या प्रचारासाठी BJP नं कोट्यवधी रुपये, रक्कम ऐकताच फुटेल घाम

पाच राज्यातल्या निवडणुकांच्या प्रचारासाठी BJP नं कोट्यवधी रुपये, रक्कम ऐकताच फुटेल घाम

आश्चर्याची बाब म्हणजे यातील 60 टक्के रक्कम एकट्या तृणमूल काँग्रेस शासित बंगालमध्ये वापरण्यात आली आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे यातील 60 टक्के रक्कम एकट्या तृणमूल काँग्रेस शासित बंगालमध्ये वापरण्यात आली आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे यातील 60 टक्के रक्कम एकट्या तृणमूल काँग्रेस शासित बंगालमध्ये वापरण्यात आली आहे.

नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर: भारतीय जनता पक्षानं (BJP) आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू, बंगाल आणि केरळमध्ये या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावर 252 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यातील 60 टक्के रक्कम एकट्या तृणमूल काँग्रेस शासित बंगालमध्ये वापरण्यात आली आहे.

भाजपनं निवडणूक आयोगाला सादर केलेल्या खर्चाच्या तपशिलानुसार, पक्षाने पाच राज्यांतील प्रचारावर 252 कोटी 02 लाख 71 हजार 753 रुपये खर्च केले. यापैकी 43.81 कोटी आसाममध्ये, 4.79 कोटी पुद्दुचेरीमध्ये, 22.97 कोटी तामिळनाडूमध्ये, 29.24 कोटी केरळमध्ये खर्च करण्यात आले.

हेही वाचा-  पुन्हा चकमक, जवानांनी घेरलं दहशतवाद्यांना; एकाचा खात्मा तर एकाचा शोध सुरु

तामिळनाडूमध्ये पक्षाने 22.97 कोटी रुपये खर्च केले. या दक्षिणेकडील राज्यात, द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (AIADMK)कडून सत्ता हिसकावून घेण्यात यशस्वी झाले. राज्यात भाजपला केवळ 2.6 टक्के मते मिळाली आहेत.

बंगालमध्ये भाजप-तृणमूलने भरपूर पैसा लुटला

बंगालमधील ममता सरकार हटवण्यासाठी भाजपने आपली पूर्ण ताकद लावली होती. पक्षाने राज्यात 151 कोटी रुपये खर्च केले. दुसरीकडे, तृणमूलने बंगालमध्ये भाजपपेक्षा थोडे अधिक म्हणजे 154.28 कोटी रुपये खर्च केले. केरळमध्ये, जिथे डावी लोकशाही आघाडी (LDF) सत्ता टिकवण्यात यशस्वी ठरली, तिथे भाजपने 29.24 कोटी रुपये खर्च केले. विविध पक्षांनी सादर केलेल्या खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाने सार्वजनिक केला आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, Election 2021, Election commission