जाहिरात
मराठी बातम्या / देश / जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, 12 तासांत 5 दहशतवाद्यांचा खात्मा; जैश कमांडर जाहिद वानीही ठार

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, 12 तासांत 5 दहशतवाद्यांचा खात्मा; जैश कमांडर जाहिद वानीही ठार

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, 12 तासांत 5 दहशतवाद्यांचा खात्मा; जैश कमांडर जाहिद वानीही ठार

जम्मू-काश्मीरमधून (Jammu and Kashmir) एक मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या 12 तासांत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba) आणि जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनेच्या 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

श्रीनगर, 30 जानेवारी: जम्मू-काश्मीरमधून (Jammu and Kashmir) एक मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या 12 तासांत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba) आणि जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनेच्या 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कमांडर जाहिद वानी (Zahid Wani) आणि एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा समावेश आहे. काश्मीरच्या आयजीपींनी सुरक्षा दलांसाठी हे मोठे यश असल्याचं म्हटलं आहे. जम्मू आणि काश्मीर डीजीपी यांनी सांगितलं की, शनिवारी रात्री बडगाम जिल्ह्यातील चरारेश्रीफ आणि पुलवामा जिल्ह्यातील नायरा येथे सुरक्षा दलांनी ही कारवाई केली. यादरम्यान बडगाममध्ये एक आणि पुलवामामध्ये चार दहशतवादी मारले गेले. सकाळी सकाळी भारतातल्या Corona संदर्भातली मोठी दिलासादायक बातमी जाहिद मंजूर वानी हा जम्मू-काश्मीरमधील जैशच्या प्रमुख केडरपैकी एक होता. 14 फेब्रुवारी 2019 रोजी ज्या लेटपुरा घटनेत 40 हून अधिक CRPF जवान शहीद झाले होते त्यात जाहिदचा सहभाग होता. जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी संध्याकाळी पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. कुलगाम जिल्ह्यात एका पोलिसाच्या हत्येनंतर पुलवामाच्या नायरा भागात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. मोठ्या संख्येनं लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफच्या पथकांनी घटनास्थळाचा ताबा घेतला होता.

जाहिरात

दुसरीकडे शनिवारी संध्याकाळीच कुलगाम जिल्ह्यातील हसनपोरा येथे संशयित दहशतवाद्यांनी हेड कॉन्स्टेबल अली मोहम्मद गनी यांची गोळ्या झाडून हत्या केली. ते हेड कॉन्स्टेबल कुलगाम पोलीस ठाण्यात तैनात होते. पोलीस कर्मचाऱ्याला गोळी झाडल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात