Home /News /national /

Corona Virus In India: भारतात कोरोनाचा वेग मंदावला, 'या' पाच राज्यातल्या स्थितीत सुधारणा

Corona Virus In India: भारतात कोरोनाचा वेग मंदावला, 'या' पाच राज्यातल्या स्थितीत सुधारणा

Coronavirus in India: मृतांच्या संख्येने तणाव वाढला आहे. काल देशभरातून कोविड-19 च्या 2.35 लाख नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर गेल्या 24 तासांत 871 लोकांचा मृत्यू झाला आहे.

  नवी दिल्ली, 30 जानेवारी: एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतातील (coronavirus in India) कोरोना व्हायरसची (Coronavirus) स्थितीत आता सुधारणा होत असल्याचं दिसून येत आहे. मात्र, मृतांच्या संख्येने तणाव वाढला आहे. काल देशभरातून कोविड-19 च्या 2.35 लाख नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर गेल्या 24 तासांत 871 लोकांचा मृत्यू झाला आहे. पण त्यात दिलासा देणारी बाब आहे की, शनिवारी देशभरातून नोंदवलेले प्रकरण शुक्रवारच्या तुलनेत 6 टक्के कमी आहेत. सक्रिय प्रकरणांबद्दल बोलायचं झालं तर देशातील कोविडच्या सक्रिय रूग्णांमध्ये आता एकूण संक्रमणांपैकी 4.91 टक्के वाटा आहे. तर राष्ट्रीय पुनर्प्राप्ती दर 93.89 टक्क्यांवर आला आहे. 26 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात 400 जिल्ह्यांनी 10 टक्क्यांहून अधिक सकारात्मकता नोंदवली.

  corona राहिल काही दिवसांचा पाहुणा, राजेश टोपेंनी सांगितली कोरोनाची 'डेडलाईन'

   अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या स्थितीत सुधारणा होत आहे. मात्र, अनेक राज्यांत रेकॉर्डब्रेक प्रकरणांची नोंद होत आहे. 21 जानेवारी रोजी देशभरातून एकूण 3,47,254 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली. तेव्हापासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट नोंदवली जात आहे. ज्या राज्यांमध्ये परिस्थिती सुधारत आहे त्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, ओडिशा, हरियाणा आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. या राज्यांमध्ये कोविडच्या प्रकरणांसोबतच सकारात्मकतेच्या दरातही घट झाली आहे.
  आता वेगवेगळ्या राज्यात काय परिस्थिती आहे ते पाहूया… जाणून घ्या कोरोनाची राज्यांप्रमाणे स्थिती काय आहे केरळमध्ये (Kerala) शनिवारी कोरोना संसर्गाचे 50, 812 नवीन रुग्ण आढळले. तर गेल्या 24 तासांत आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 3,36,202 सक्रिय प्रकरणे आहेत. कर्नाटकमध्ये कोविड-19 चे 33 हजार 337 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 70 जणांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात 2 लाख 52 हजार 132 सक्रिय रुग्ण आहेत. शनिवारी, तामिळनाडूमध्ये कोविड -19 चे 24,418 रुग्ण आढळले, ज्यामध्ये चार रुग्ण परदेशातून परतले होते. गेल्या 24 तासांत येथे संसर्गामुळे 46 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 2,08,350 सक्रिय रुग्ण आहेत.

  U19 World Cup : भारताची यंग ब्रिगेड सेमीफायनलमध्ये धडक, बांग्लादेशला चारली धूळ!

   शनिवारी, राजस्थानमध्ये कोरोना व्हायरसचे 10,437 नवीन रुग्ण आढळले, तर 22 रुग्णांचा संसर्गामुळे मृत्यू झाला. राज्यात या संसर्गामुळे आतापर्यंत एकूण 9,224 लोकांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी जम्मू-काश्मीरमध्ये कोरोनाचे 4,175 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली, ज्यामुळे संक्रमित लोकांची संख्या 4,28,260 वर पोहोचली. यासोबतच गेल्या 24 तासांत या कोरोनामुळे आणखी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण मृतांची संख्या 4,652 आहे.
  छत्तीसगडमध्ये कोरोनाचे 3 हजार 783 नवीन रुग्ण हरियाणात आणखी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 4,445 नवीन कोविड बाधित आढळले आहेत. राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 9,42,051 वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत 10,269 लोकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, छत्तीसगडमध्ये कोरोनाचे 3783 नवीन रुग्ण आढळले आहेत. अशा प्रकारे, राज्यातील संक्रमितांची संख्या 11,20,797 वर पोहोचली आहे. शनिवारी राज्यात 15 रुग्णांचा संसर्गामुळे मृत्यू झाला. अशा प्रकारे मृतांची संख्या 13,824 वर पोहोचली आहे. मध्य प्रदेशात कोविडचे 8,678 नवीन रुग्ण आढळल्याने, संक्रमित लोकांची संख्या 9,50,134 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोविडमुळे पाच रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशाप्रकारे राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 10,607 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याच वेळी, गुजरातमध्ये कोरोनाचे 11974 नवीन रुग्ण आढळल्यानंतर एकूण संक्रमित लोकांची संख्या 11,44,585 झाली आहे. तर 33 रुग्णांच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या 10,408 वर पोहोचली आहे.

  लपतछपत घरात शिरला, पीडितेचे अश्लील व्हिडीओ बनवले; शेजारच्या तरुणाचं संतापजनक कृत्य

   दुसरीकडे, शनिवारी महाराष्ट्रात कोविड-19 चे 27,971 नवीन रुग्ण आढळले, त्यापैकी 85 ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आहेत. यासोबतच आणखी 61 रुग्णांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण बाधितांची संख्या 76,83,525 वर पोहोचली आहे, तर आणखी 61 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 1,42,522 वर पोहोचली आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: Corona virus in india, Coronavirus

  पुढील बातम्या