जाहिरात
मराठी बातम्या / देश / घराच्या बांधकामासाठी खोदकाम करताना सापडली 250 चांदीची नाणी; खजिन्याच्या शोधासाठी प्रशासनाची शोध मोहीम

घराच्या बांधकामासाठी खोदकाम करताना सापडली 250 चांदीची नाणी; खजिन्याच्या शोधासाठी प्रशासनाची शोध मोहीम

घराच्या बांधकामासाठी खोदकाम करताना सापडली 250 चांदीची नाणी

घराच्या बांधकामासाठी खोदकाम करताना सापडली 250 चांदीची नाणी

एका शेतकऱ्याच्या घराचे बांधकाम करण्यासाठी खांब उभारण्याकरिता खोदकाम सुरू असताना मोठा खजिना सापडला आहे. या खजिन्यात चांदीच्या नाण्यांचा समावेश असून, ही नाणी 150 वर्षांपूर्वीची असावीत असं सांगितलं जात आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 11 मार्च :  पुरातन वास्तुंमध्ये खोदकाम करताना जुन्या काळातील वास्तूंचे अवशेष, वस्तू, देव-देवतांच्या मूर्ती, हत्यारं किंवा नाणी सापडल्याचं आपण ऐकतो, वाचतो. यातून पुरातन संस्कृतीविषयी महत्त्वाचे पुरावे हाती लागत असतात. उत्तर प्रदेशातील जालौन येथे काहीसा असाच प्रकार घडला आहे. येथे एका शेतकऱ्याच्या घराचे बांधकाम करण्यासाठी खांब उभारण्याकरिता खोदकाम सुरू असताना मोठा खजिना सापडला आहे. या खजिन्यात चांदीच्या नाण्यांचा समावेश असून, ही नाणी 150 वर्षांपूर्वीची असावीत असं सांगितलं जात आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पुरातत्त्व विभागाचे अधिकारी पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ही नाणी जप्त केली आहेत. `आज तक`ने या विषयीची माहिती दिली आहे. उत्तर प्रदेशातील जालौन येथे एका घराच्या बांधकामासाठी खांब उभारण्याकरिता खोदकाम सुरू असताना इसवी 1800 मधील जुनी चांदीची नाणी सापडली आहेत. खोदकाम करताना चांदीची नाणी सापडल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. त्यानंतर ग्रामस्थांनी ही माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच पुरातत्त्व विभागाचे अधिकारी पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ही नाणी जप्त केली. खोदकामादरम्यान सापडलेली नाणी 150 वर्षांपूर्वी असल्याचं बोललं जात आहे. या मंदिरात भाविक पूजाही करत नाहीत तरीही आहे प्रसिद्ध, काय आहे इतिहास? जालौन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील व्यासपुरा गावातील शेतकरी कमलेश कुशवाह पंतप्रधान घरकूल योजनेतून मिळालेल्या निधीतून घराचे बांधकाम करत होते. घरासाठी पाया खोदताना अचानक मजुरांना काही नाणी सापडली आणि ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. या ठिकाणी मोठा खजिना असावा असं परिसरातील लोकांना वाटू लागलं आणि त्यांनी याबाबतची माहिती ग्रामीण पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच जालौन पोलिसांनी बांधकाम सुरू असलेले घर ताब्यात घेतले आणि फॉरेन्सिक पथकासह पुरातत्त्व विभागाला यासंदर्भात माहिती दिली. ही नाणी किती प्राचीन आहेत, याची माहिती मिळण्यासाठी पोलिसांनी पुरातत्त्व विभागाला घटनास्थळी दाखल होण्याची सूचना दिली. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने याठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले. तसेच नाणी जप्त करून ती पोलीस स्टेशनला आणली गेली. आतापर्यंत या ठिकाणी अडीचशे पेक्षा जास्त चांदीची नाणी सापडली आहेत. याप्रकरणी उरईचे उपजिल्हाधिकारी राजेश सिंह म्हणाले, ``खोदकामादरम्यान चांदीची नाणी सापडल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर आम्ही पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचलो. ज्या घरात चांदीची नाणी सापडली त्या घराचे बांधकाम सध्या सुरू आहे. कमलेश कुशवाह या व्यक्तीचे हे घर आहे.`` दरम्यान, जिल्हा प्रशासनाने खजिन्याचा शोध घेण्यास सुरूवात केली आणि या परिसराला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले. रात्री उशिरापर्यंत जिल्हा प्रशासनाने याठिकाणाहून 250 चांदीची नाणी आणि चार चांदीचे कडे जप्त केले. ही नाणी 150 वर्षांपेक्षा जुनी असावी असं सांगितलं जात आहे. रात्री उशीरा खोदकाम थांबवण्यात आले आणि घटनास्थळी पोलीस तैनात करण्यात आले. सकाळी पुरातत्त्व विभाग, महसूल विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पुन्हा खजिन्याचा शोध घेण्यासाठी खोदकाम सुरू करण्यात आले होते. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा होती.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात