नवी दिल्ली, 30 जानेवारी : दिल्लीतील इस्रायलच्या दूतावासाजवळ (israel embassy) एक स्फोट (Blast) झाला होता. या स्फोटाचं (Delhi blast news) गांभीर्य लक्षात घेवून भारतीय तपास यंत्रणा आयबी (IB) तपास सुरू केला आहे. या स्फोटासंदर्भात काही महत्त्वाचे धागेदोरे तपास यंत्रणेच्या हाती लागल्याचं म्हटलं जात आहे. या स्फोटाच्या तपासासाठी आयबी आणि एनआयए (NIA) या दोन तपास यंत्रणा मैदानात आहेत. दिल्ली पोलीसही मदतीला आहे. आता यामध्ये आणखी एका तपास यंत्रणेची भर पडली आहे. इस्त्रायलची (israel) जगप्रसिद्ध गुप्तचर संस्था मोसादही (Mossad) या प्रकरणाचा तपास करणार आहे.
शुक्रवारी सायंकाळी 5 च्या सुमारास दिल्लीतील इस्रायल दूतावासाजवळ हा स्फोट झाला आहे. या स्फोटाचं आता इराण कनेक्शन समोर आलं आहे. तपासादरम्यान घटनास्थळावरून पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीच्या माध्यमातून यामागे दहशतवाद्यांचा हात असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला आता आंतराष्ट्रीय स्वरूप आले आहे. संबंधित आरोपींना पकडण्यासाठी आता तातडीची पावलं उचलली जात आहेत.
गुन्हे शाखेला संशय आहे की, हल्लेखोरांनी ऑनलाइन कॅब बुकिंगच्या माध्यमातून हा धमाका घडवून आणला आहे. त्यामुळे अब्दुल कलाम रोडवर घटनास्थळापासून ते 3 किमी पर्यंत किती लोकांनी कॅब बूक केली होती. याची माहिती घेतली जात आहे. त्यासाठी ओला आणि उबरला संपर्क साधण्यात येत आहे.
या स्फोटानंतर पोलिसांकडून आता इराणी नागरिकांची माहिती घेण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर जवळच्या सर्व हॉटेल आणि रेस्ट्रॉरंटशी संपर्क साधून तिथे राहणाऱ्या इराणी नागरिकांबाबत चौकशी करण्यात येत आहे. त्याचबरोबर आसपासच्या असंख्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची झडती पोलिसांकडून घेण्यात येत आहे. या तपासादरम्यान दोन संशयित व्यक्ती कॅबमधून उतरून संशयास्पदरित्या फिरताना दिसले आहेत. त्यामुळे आता याप्रकरणी कॅब चालकांचीही चौकशी करण्यात येत आहे.
Delhi Blast: बॉम्ब बनवण्यासाठी वापरल्या या वस्तू? घटनास्थळाचे Exclusive फोटो
इस्त्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसाद ही जगातील सर्वात ताकदवान गुप्तचर संस्था समजली जाते. याप्रकरणाचा छडा लावण्यासाठी आता मोसाद भारताला मदत करणार आहे. या स्फोटानंतर इस्त्रायली दुतावासाला एक पत्र पाठवण्यात आलं आहे. या पत्रात या घटनेचा उल्लेख 'ट्रेलर' असा करण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण हलक्यात घेण्याची चूक या तपास यंत्रणा करताना दिसत नाहीत. इराणीचा लष्करातील वरिष्ट अधिकारी कासीम सुलेमानी आणि इराणचे अणू वैज्ञानिक मोहसिन फखरीजादेह यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हे कृत्य केल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi Blast