याठिकाणी विशेष पथकाला हे आर्टिकल सापडलं आहे. दरम्यान या पथकाला घटनास्थळी इस्लायल ऍम्बसीचा (Israel Embassy) पत्ता असलेलं एक बंद पाकीट सापडलं आहे. या पाकिटावर इस्रायलच्या दूतवासातील एका अधिकाऱ्याबाबत मजकूर लिहिलेला आहे. या पाकिटाचा आणि त्याच्यावरच्या मजकुराचा बॉम्बस्फोटाशी संबंध आहे का, याचा तपास विशेष पथक करत आहे.
दरम्यान या स्फोटावेळची सीसीटीव्ही दृष्य पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. या फूटेजमध्ये एका टॅक्सीतून दोन जण खाली उतरून घटनास्थळी पोहोचले आणि त्यानंतर ही टॅक्सी रवाना झाली. हे दोघंही संशयीत स्फोट घडवण्यासाठी चालत तिकडे गेले होते. पोलिसांच्या पथकाने या टॅक्सी चालकाची चौकशी केली आहे. बॉम्ब लावल्यानंतर दोन्ही संशयीत तिकडून पळून गेले आहेत.