मुंबई, 29 जानेवारी: राजधानी दिल्लीतला सर्वाधिक सुरक्षित मानला जाणारा ल्युटन्स झोन शुक्रवारी संध्याकाळी एका बाँब स्फोटाने हादरला. हा LED स्फोट इस्रायल दूतावासाजवळ झाला. या स्फोटात जीवितहानी झालेली नसली, तरी विजय चौकाजवळ झालेल्या स्फोटाने राजधानी हादरली आहे. देशभरातल्या महत्त्वाच्या शहरांतली सुरक्षा यंत्रणा कडक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषतः मुंबई हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police on high alert)बंदोबस्तात वाढ केली आहे.
विमानतळ आणि सरकारी इमारतींचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. इस्रायल एम्बसीजवळ स्फोट झाल्याने मुंबईतही ज्यूंची वर्दळ असणाऱ्या नरिमन हाउसची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
इस्रायल दूतावासाजवळ हा स्फोट झाला. हा भाग दिल्लीतला सगळ्यात हाय प्रोफाइल भागाजवळ आहे. स्फोट झाला ते ठिकाण विजय चौकापासून फक्त दीड किलोमीटरवर आहे. याच विजय चौकात बीटिंग रीट्रीट (Beating the retreat) कार्यक्रम सुरू होता. फक्त या कार्यक्रमामुळे स्फोटाच्या हानीचं प्रमाण कमी झालं. दरवर्षीप्रमाणे 26 जानेवारीनंतर राष्ट्रपती भवनाजवळ हा बीटिंग रीट्रिटचा कार्यक्रम होते. त्यासाठी विजय चौकापासूनच मोठा फौजफाटा आणि बंदोबस्त असतो. तसंच या परिसरातले रस्ते सामान्य वाहतुकीसाठी बंद केले जातात.
दिल्ली स्फोटात तीन गाड्यांच्या काचा तुटल्या आहेत. यामध्ये जीवित हानी किंवा जखमी झाल्याचं वृत्त आलेलं नाही. फुटपाथजवळ IED लपवून ठेवलं होतं.
Security increased at the consulate general of Israel office in Mumbai. #delhiblast pic.twitter.com/So6NiTY2Ts
— Manoj Khandekar (@manojkhandekar) January 29, 2021
दिल्ली स्फोटातून 10 महत्त्वाच्या गोष्टी
1. इस्रायल दूतावासाजवळ सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी ब्लास्ट झाला
2. फुटपाथजवळ IED लपवून ठेवलं होतं.
3. ब्लास्टमुळे तीन गाड्यांच्या काचा तुटल्या आहेत. यामध्ये जीवित हानी किंवा जखमी झाल्याचं वृत्त आलेलं नाही.
4. दिल्लीतील VVIP भागात हा ब्लास्ट झाला असून इस्त्रायल दूतावासापासून 150 मीटर अंतरावर ब्लास्ट
5. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा ब्लास्ट कमी तीव्रतेचा होता. गोंधळ पसरवण्यासाठी हा ब्लास्ट करण्यात आला आहे.
6. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलसोबत एनआयएनेदेखील कमी स्फोटाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
7. सीसीटीवीच्या आधारावर दोन संशयितांचा तपास सुरू आहे.
8. दिल्लीत बीटिंग द रिट्रीटचा कार्यक्रम सुरू होता, त्यापासून कब्बल दोन किमी अंतरावर VVIP भागात ब्लास्ट झाला.
9. बीटिंग द रिट्रीट हा कार्यक्रम असल्याकारणाने ट्रॅफिक डायवर्शन झाल्याने इस्त्रायली दूतावासाजवळ खूप कमी लोक होते.
10. हा दहशतवादी हल्ला होता की नाही याबाबत दिल्ली पोलीस तपास करीत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Breaking News, Delhi Blast, Delhi News