नवी दिल्ली, 2 जुलै: महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला (MahaVikas Aghadi Government) कोंडीत पकडण्याची एकही संधी भाजप (BJP) सोडताना दिसत नाहीये. काही दिवसांपूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, महाराष्ट्रात योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम केला जाईल. याच संदर्भात आज भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Mos Raosaheb Danve) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. करेक्ट करण्याची हीच ती वेळ? रावसाहेब दानवे म्हणाले, ही ती वेळ नाही.. करेक्ट कार्यक्रम याचा अर्थ येणाऱ्या ज्या आगामी निवडणुका आहेत. ज्याला जनतेतून निवडून यावं लागतं मग, महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभेची पोटनिवडणूक असो. पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत आम्ही करेक्ट कार्यक्रम केला. वेळेला बंधन नसतात. तारीख दिली नव्हती, जेव्हा जेव्हा निवडणूक होतील तेव्हा दाखवून देऊ राज्यात आमची काय ताकद आहे ती. देलगूरच्या पोटनिवडणुकीत दाखून देऊ ताकद त्याला म्हणतात करेक्ट वेळ. तीन पक्ष एकत्र आहेत विधानसभा अध्यक्ष्यपदासाठी त्यांचं संख्याबळ आहे. त्यांनी निवडणूक घ्यावी, हा आकड्यांचा खेळ आहे. विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक व्हावी ही आमची इच्छा आहे. भाजप उमेदवार देणार नाही असे मी म्हटले नाही असंही रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. “ED, CBIचे प्रयत्न संपले तर सरकार पाडायला महाराष्ट्रात आर्मी आणा” संजय राऊतांचं टीकास्त्र जरेंडेश्वर कारख्यान्यावरील कारवाई रावसाहेब दानवे म्हणाले, जरेंडेश्वर कारख्यान्यावरील कारवाई पृथ्वीराज चव्हाण सीएम असताना सुरु झाली. या कारखान्यात आर्थिक अनियमितता होती. त्यामुळे उगाच राज्याचे नेते केंद्रावर ठपका ठेवतात. ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणा स्वायत्त आहेत. मराठा आरक्षण आरक्षण टिकवण्यासाठी राज्याने वकिलांची फौज उभी करावी. सुप्रीम कोर्टात, केंद्राने आरक्षण द्यावे. हे 2014 च्या आधी का कळलं नाही यांना. यांना आरक्षण टिकवता आलं नाही आता खापर केंद्रावर फोडत आहेत. राज्याच्या जनतेची दिशाभूल करत आहेत. केंद्राचा या आरक्षणाशी संबंध नाही असंही रावसाहेब दानवे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.