• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • "ED, CBIचे प्रयत्न संपले तर सरकार पाडायला महाराष्ट्रात आर्मी आणा" संजय राऊतांचं टीकास्त्र

"ED, CBIचे प्रयत्न संपले तर सरकार पाडायला महाराष्ट्रात आर्मी आणा" संजय राऊतांचं टीकास्त्र

Sanjay Raut Exclusive: संजय राऊत म्हणाले, राज्यपालांना जेव्हढी कळकळ विधानसभा अध्यक्ष पदासाठी आहे तेव्हढी कळकळ विधान परीषदेच्या १२ जागांसाठी असती तर आम्हाला आनंद झाला असता.

  • Share this:
मुंबई, 2 जुलै: गेले तीन आठवडे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्नं मोठ्या प्रमाणात विरोधकांकडून सुरू होते. त्यातच सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government)मध्ये सर्वकाही आँलवेल नसल्याचंही दिसून येत होतं. त्यातच महाविकास आघाडी सरकारचे संकट मोचक शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena Leader Sanjay Raut) यांच्या दिल्ली ते मुंबई अशा जोर बैठका वाढल्या होत्या. त्यामुळे खरचं राज्यात पुन्हा एकदा सत्ता संघर्ष सुरू होणार का...? अशी मोठी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे. या सर्व प्रश्नांवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझीव्ह (Sanjay Raut Exclusive) मुलाखतीत सडेतोड उत्तरे दिली आहे. ...तर महाराष्ट्रात आर्मी आणा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री, नेत्यांच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून ईडी, सीबीआयकडून कारवाई होत असल्याचं दिसत आहे. यावर संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडत म्हणाले, 'सरकार अस्थिर करण्यासाठी ED, CBI आणि इनकम टँक्स चा वापर होताना स्पष्टंपणे दिसतोय. ED आणि CBI चे प्रयत्नं संपले की मग महाराष्ट्रात सैन्य आणा... राज्य सरकार पाडायला. तोफा मारा आमच्यावर..., जेव्हढे तुम्ही आमच्यावर हल्ले कराल तेव्हढे आम्ही तीनही पक्ष मजबूत होऊ घट्ट... आणि झालेलो आहोत.' मुंबई बँक गैरव्यवहार प्रकरण: 'कर नाही त्याला डर कशाला' म्हणत दरेकरांनी आरोपांवर सोडले मौन तेवढी कळकळ विधान परीषदेच्या 12 जागांसाठी दाखवा संजय राऊत म्हणाले, राज्यपालांना विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत कळकळ आहे... आता राज्यपालांना मुख्यमंत्र्यांनीही पत्र पाठवलंय. राज्यपालांना जेव्हढी कळकळ विधानसभा अध्यक्ष पदासाठी आहे तेव्हढी कळकळ विधान परीषदेच्या 12 जागांसाठी असती तर आम्हाला आनंद झाला असता. पण तसं दिसत नाही. राज्यपालांनी किती ही पत्र पाठवली तरी अस्वस्थ व्हायचं कारण नाही. पत्रांचा ओघ वाढलांच तर त्यासाठी एक वेगळा डेक्स निर्माण करावा लागेल. विधानसभा अध्यक्ष पदासाठी तीनही पक्षांमध्ये एकमत आहे. त्यांना दिल्लीतून आदेश घ्यावे लागतात दिल्लीत एवढं अप्रूप काय आहे. शरद पवार दिल्लीत गेले की बातम्या सुरू होतात. काल परवा देवेंद्र फडणवीसही दिल्लीत गेले लगेच बातम्या सुरू... त्यांच्या पक्षाचे प्रमख नेते दिल्लीत बसतात म्हणून ते गेले असतील. दिल्लील्या नेत्याकडूनच त्यांना आदेश घ्यावे लागतात. पण दिल्लीत गेलो की लगेच हालचाल... मी गेलो कारण माझं काम होतं. खासदार असल्यामुळे आमचे काही घटनात्मक विषय असतात त्यामुळे जावं लागतं.
Published by:Sunil Desale
First published: