• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • तामिळनाडूमध्ये सेलिब्रिटींचे नेते होण्याचा ट्रेंड संपला का? कोण आहेत वानती श्रीनिवास ज्यांनी कमल हसनचा केला पराभव

तामिळनाडूमध्ये सेलिब्रिटींचे नेते होण्याचा ट्रेंड संपला का? कोण आहेत वानती श्रीनिवास ज्यांनी कमल हसनचा केला पराभव

येथे भाजपने लोकल विरुद्ध बाहेरील अशा मुद्द्यावरुन निवडणुकीत उतरली होती.

 • Share this:
  बंगळुरू, 3 मे : मक्कल निधि मय्यम पार्टीचे प्रमुख आणि अभिनेता कमल हसन हे कोईंबतूर दक्षिण भागातून निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यांच्या समोर भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा वानती श्रीनिवास मैदानमध्ये होत्या. त्यांनी कमल हसनला मोठं आव्हान दिलं होतं. डीएमके-काँग्रेस युतीचे उमेदवार म्हणून काँग्रेस नेता मयूरा जयकुमार निवडणूक लढत होते. तर अम्मा मक्कल मुनेत्र कड़गम ने AIADMK चे माजी नेता चॅलेंजर आर दुरईसामीला आव्हान दिलं, जे एक उद्योगपती आहेत. तामिळनाडूमध्ये अभिनेतानंतर नेता झालेल्यांना नेहमीच संधी दिली जाते. मात्र सध्याचा ट्रेंड बदलल्याचं चित्र आहे. साऊथचे सुपरस्टार कमल हसन यांना कोईबंतूर दक्षिणमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजप कमल हसन यांना गेस्ट ऑफ कोयंबटूर मानूनच मैदानात उतरली होती. येथून वानती श्रीनिवासन यांना मैदानात उतरवण्यात आलं होतं. वानती या स्थानिक असून हिच बाब महत्त्वपूर्ण ठरली. येथे भाजपने लोकल विरुद्ध बाहेरील अशा मुद्द्यावर खेळले. वानती श्रीनिवासन यांनी 2016 च्या विधानसभा निवडणुकीत 21.57 मतदानासह 33,113 वोट मिळवले होते आणि AIADMK चे उमेदवार अम्मान के. अर्जुनने 38.94 टक्क्यांसह 59,788 वोट मिळवून सीट जिंकली होती. अन्नाद्रमुक आणि भाजप आता एका निवडणुकीच्या युतीत होते आणि श्रीनिवासन या युतीचे उमेदवार असल्याने अधिक मजबूत झाली होती. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार म्हणून मयूरा जयकुमार यांनी 27.60 मतांच्या टक्केवारीसह 42,369 मतं मिळवली होती. आणि  एआईएडीएमकेच्या अम्मानच्या अर्जुन यांच्याविरोधात निवडणूक हरले होते. हे ही वाचा -West Bengal निवडणुकीत पवारांचा अदृश्य हात! आव्हाडांच्या ट्विटनंतर नव्या चर्चा सेलिब्रिटी असल्या कारणाने कमल यांच्या प्रचारात गर्दी झाली मात्र त्याचं रुपांतर मतांमध्ये झालं नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कमल फ्लॉप ठरले आणि यंदाही त्यांच्या पक्षाला खातं उघडता आलं नाबी. यावरुन असं लक्षात येत आहे की, अभिनेता म्हणून कमल हसन लोकांना भावले, मात्र नेता म्हणून जनता त्यांचा स्वीकार करीत नाही. कोण आहेत वानती श्रीनिवास? वानती श्रीनिवास भाजप भारतीय महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. 50 वर्षीय वानती श्रीनिवास तमिळनाडूच्या कोईंबतूरमध्ये राहतात. त्यांचे पती श्रीनिवास मद्रास हाय कोर्टातील प्रसिद्ध वकील आहेत. ते मद्रास हाय कोर्टात केंद्र सरकारचे असिस्टेंट सॉलिसीटर जनरल राहिले आहेत. ते अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये नॅशनल यूथ कमिशनचे सदस्य होते. याशिवाय त्यांच्याजवळ विश्व हिंदू परिषदेच्या प्रदेश मंत्री होते. यानुसार वानती श्रीनिवास यांचं कुटुंब संघ आणि भाजपच्या जवळ आहेत.  
  Published by:Meenal Gangurde
  First published: