जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Gondia Rain Update : ‘या’ जिल्ह्यात पावसाचा कहर 11 लोक, 767 घरे, 39 जनावरे दगावली, शासनाची मदत नाहीच

Gondia Rain Update : ‘या’ जिल्ह्यात पावसाचा कहर 11 लोक, 767 घरे, 39 जनावरे दगावली, शासनाची मदत नाहीच

Gondia Rain Update : ‘या’ जिल्ह्यात पावसाचा कहर 11 लोक, 767 घरे, 39 जनावरे दगावली, शासनाची मदत नाहीच

गोंदियात झालेल्या पावसाने 767 घरे उद्ध्वस्त झाले आहेत. आतापर्यंत 11 लोकांचा मृत्यु झाला आहे. तर आतपर्यत्न 39 जनावरे देखील दगावली आहेत.

  • -MIN READ gondia,maharashtra
  • Last Updated :

गोंदिया, 19 जुलै : गोंदिया जिल्ह्यात पावसाचा कहर पहायला मिळाले असून गोंदियात मुसळधार येणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे. गोंदियात झालेल्या पावसाने 767 घरे उद्ध्वस्त झाले आहेत. आतापर्यंत 11 लोकांचा मृत्यु झाला आहे. तर आतपर्यत्न 39 जनावरे देखील दगावली आहेत. दरम्यान हिंगोली जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान कोणतीही प्रशासनाकडून आर्थीक मदत मिळाली नाही. (Gondia Rain Update)

जाहिरात

गोंदिया जिल्हात जुलै महिना हा नैसर्गिक आपत्तीचा महीना ठरला असून जिल्ह्यात सततच्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यात जुलै महिन्यात आतापर्यंत पडलेल्या पावसाने नैसर्गिक आपत्तीमध्ये जिल्ह्यात 11 व्यक्ती मरण पावले आहेत. त्यात 4 व्यक्तींचा पुरात वाहून मृत्यू तर वीज पडून 7 व्यक्ती मरण पावले आहेत. जिल्ह्यातील पडझड झालेली घरे/गोठे एकूण 767 आहेत. यामध्ये पुर्णत: पडझड झालेल्या पक्क्या व कच्च्या घरांची संख्या 16, अंशत: पडझड झालेल्या पक्क्या घरांची संख्या 1, अंशत: पडझड झालेल्या कच्च्या घरांची संख्या 638 असून यात 112 बाधित गोठ्यांचा समावेश आहे.

हे ही वाचा :  विदर्भ, कोकणात पुढचे चार दिवस मुसळधार, मुंबईत, पुण्यात पावसाची अशी असेल परिस्थिती

दरम्यान यात जनावरे देखील सुटले गेले नसून 39 जनावरांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये मोठी दुधाळ जनावरे 6, लहान दुधाळ जनावरे 27, ओढकाम करणारी मोठी जनावरे 4 व ओढकाम करणारी 2 लहान जनावरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आता पर्यत्न 11 मृतका पैकी 5 मृतक व्यक्तींच्या वारसांना मदत म्हणून 20 लाख रुपये देण्यात आले असून 6 प्रकरणे प्रलंबीत आहेत. जिल्हाला नुकसान भरपाईसाठी आतापर्यंत 30 लाख 26 हजार रुपये प्राप्त झाले असून त्यात 20 लाख रुपये संबंधितांना मदत करण्यात आलेली आहे. लवकरच इतर मृत व्यक्तीना मदत मिळणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येत आहे.

जाहिरात

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्याने कोकण व विदर्भात आगामी चार दिवस पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील उर्वरित भागात मात्र तुरळक ठिकाणी पाऊस राहणार असल्याचे सांगण्यात आले. विदर्भातही कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्या भागातही 19 ते 22 जुलैपर्यंत पाऊस राहणार आहे.

हे ही वाचा :  विदर्भात पावसाने घरं पडून लोक मरतायेत, नेते मात्र फोडाफोडीत व्यस्त नागरिकांचा संताप

जाहिरात

पावसाचा जोर कमी असला तरी संततधार पाऊस असण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर ओसरला असून, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात