West Bengal Election 2021: ममता बॅनर्जींवर हल्ला नसून ती केवळ दुर्घटना; रिपोर्टमधून झालं स्पष्ट

West Bengal Election 2021: ममता बॅनर्जींवर हल्ला नसून ती केवळ दुर्घटना; रिपोर्टमधून झालं स्पष्ट

पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममध्ये दुखापत (Mamata Banerjee) झाली होती. ही घटना कोणताही पुर्वनियोजित हल्ला नसून केवळ एक दुर्घटना होती.

  • Share this:

नवी दिल्ली 14 मार्च : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांना शुक्रवारी सायंकाळी एसएसकेएम रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती समाधानकारक असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर त्यांना सोडण्यात आलं. वारंवार ममता यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याची मागणी केली, त्यानंतर डॉक्टरांनी हा निर्णय घेतला. तर, या घटनेबाबत माहिती देताना पश्चिम बंगाल सरकारने बॅनर्जी यांच्या दुखापतीबाबत निवडणूक आयोगाला (Election Commission) पाठवलेल्या अहवालात 'चार-पाच जणांच्या हल्ल्याचा' उल्लेख केला नव्हता. राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनं याबाबत सांगितलं होतं.

पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममध्ये दुखापत झाली होती. ही घटना कोणताही पुर्वनियोजित हल्ला नसून केवळ एक दुर्घटना होती. असा अहवाल आता निवडणूक पर्यवेक्षकांनी निवडणूक आयोगाला पाठवला आहे. या अहवालामध्ये ही गोष्ट स्पष्ट केली गेली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी सांगितलं, की विशेष पर्यवेक्षक अजय नायक आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीसाठीचे विशेष पोलीस पर्यवेक्षक विवेक दूबे यांनी हा रिपोर्ट तयार केला आहे. यामध्ये सांगितलं गेलं आहे, की १० मार्चला ममता बॅनर्जी यांनी नामांकन दाखल केल्यानंतर मिदनापूर जिल्ह्यातील नंदीग्रामच्या बिरुलिया बाजारात ही घटना अचानक घडली. मात्र, हा पुर्वनियोजित कट असल्याचं म्हटलं जात होतं.

रिपोर्टमध्ये असंही म्हटलं गेलं, की घटना अचानक घडल्यामुळं ममता बॅनर्जी जखमी झाल्या. सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार, रिपोर्टमध्ये म्हटलं गेलं आहे,की ही घटना कोणताही पुर्वनियोजित कट नव्हती. ही एक दुर्घटना होती, जी अचानक घडली. पुढे असंही म्हटलं गेलं, की अचानक घडलेल्या या घटनेमुळे बॅनर्जी यांना दुखापत झाली. या घटनास्थळी उपस्थित असलेले प्रत्यक्षदर्शी आणि काही व्हिडीओच्या माध्यमातून माहिती घेत हा रिपोर्ट तयार केला गेला.

निवडणूक प्रचारादरम्यान जखमी झालेल्या ममता बॅनर्जी यांना झालेल्या दुखापतीच्या घटनेबाबतचा रिपोर्ट पश्चिम बंगालचे मुख्य सचिव आणि विशेष निवडणूक पर्य़वेक्षकांनी सादर केलेल्या रिपोर्टनंतर आज निडणूक आयोग याबाबत निर्णय घेईल. ममता बॅनर्जी बुधवारी नंद्रीग्राम विधानसभेच्या जागेसाठी आपलं नामांकन पत्र दाख करण्यासाठी गेल्या असता ही घटना घडली होती. चार ते पाच लोकांनी आपल्याला धक्का दिल्याचा आरोप ममता यांनी केला होता.

Published by: Kiran Pharate
First published: March 14, 2021, 7:44 AM IST

ताज्या बातम्या