मराठी बातम्या /बातम्या /देश /10 वर्षांत पहिल्यांचाद एवढी महाग झाली साखर, जाणून घ्या नेमकं काय कारण?

10 वर्षांत पहिल्यांचाद एवढी महाग झाली साखर, जाणून घ्या नेमकं काय कारण?

 जवळपास प्रत्येक घरात महिन्याला किलोकिलोनी साखर लागत असेल. या साखरेच्या गोडव्याने आता भाव खाल्ला आहे.

जवळपास प्रत्येक घरात महिन्याला किलोकिलोनी साखर लागत असेल. या साखरेच्या गोडव्याने आता भाव खाल्ला आहे.

जवळपास प्रत्येक घरात महिन्याला किलोकिलोनी साखर लागत असेल. या साखरेच्या गोडव्याने आता भाव खाल्ला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : चहा कॉफी किंवा अगदीच दुधाची चव वाढवणारा पदार्थ म्हणजे साखर. अगदी एखाद्याचं तोंड गोड करायचं असेल तरी आपण अगदी सहज साखर आणून समोरच्याला भरवतो किंवा हातावर ठेवतो. महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाताना आधी दही साखर दिलं आहे. साखरेचं आपल्या आयुष्यात असणं किती महत्त्वाचं झालं आहे ना. जवळपास प्रत्येक घरात महिन्याला किलोकिलोनी साखर लागत असेल. या साखरेच्या गोडव्याने आता भाव खाल्ला आहे.

जगभरात वाढणारी महागाई, आर्थिक मंदीचे संकट या सगळ्यामुळे आता महागाई वाढत असल्याचा दबाव साखरेवर आला आहे. गेल्या 10 वर्षात साखरेनं सर्वाधिक उच्चांक गाठला आहे. साखर पुन्हा एकदा महाग झाली आहे.

CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार या आठवड्यात जागतिक बाजारात रिफाइंड साखरेच्या दराने दशकातील सर्वोच्च पातळी गाठली आहे. तर कच्च्या साखरेचे भाव 6 वर्षांच्या वरच्या पातळीवर पोहोचले आहेत. भारताकडून साखरेच्या निर्यातीत झालेली घट हे साखरेचे दर वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे.

महागाईचा आगडोंब; सर्वसामान्यांनी सांगा जगायचं कसं? वाचा काय झालंय महाग

खरं तर, देशांतर्गत बाजारात साखरेचे भाव कमी ठेवण्याचा भारताचा प्रयत्न आहे. भारताने साखरेची निर्यात 11 दशलक्ष टनांवरून 6 दशलक्ष टनांवर आणली असून ती आणखी 4 दशलक्ष टनांपर्यंत कमी होण्याची भीती आहे. त्यामुळे साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

साखरेचे दर वाढल्याचा परिणाम परदेशात दिसून येत आहे. युरोपमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या अशा उत्पादनांची बाजारात पूर्वीपेक्षा जास्त दराने विक्री होत आहे. त्याचबरोबर आगामी काळात या किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण जगातील सर्वात मोठा साखर निर्यातदार ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन होण्याची चिन्हे दिसत आहेत. अवकाळी पावसाने गाळप लांबणीवर टाकले आहे. त्यामुळे भावातील वाढ पुढेही सुरू राहू शकते.

First published:
top videos

    Tags: Money, Sugar, Sugar facrtory