दूध हे संपूर्ण पोषक तत्व आहे, जे शरीराच्या गरजेनुसार कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, पोटॅशियमची गरज पूर्ण करते. निरोगी राहण्यासाठी दुधाचे अनेक फायदे आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
जर तुम्हाला अनेकदा पोटात जळजळ, आम्लपित्त आणि अल्सरचा त्रास होत असेल तर थंड दूध हा उत्तम उपाय आहे. जर तुम्हाला पचनाच्या समस्यांमुळे त्रास होत असेल, तर तुम्ही एक ग्लास थंड दुधात एक चमचा इसबगोल टाकू शकता, कारण ते बद्धकोष्ठता आणि ऍसिड रिफ्लक्सपासून आराम देते.
थंड दूध खरोखर वजन कमी करण्यास मदत करते. थंड दुधात कॅल्शियम असल्यामुळे तुमच्या शरीरातील चयापचय क्रिया सुधारते. अशा प्रकारे जास्त कॅलरीज बर्न होतात. एक ग्लास दूध प्यायल्याने तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि अनावश्यक स्नॅकिंग टाळण्यास देखील मदत होते.
थंड दूध इलेक्ट्रोलाइट्सने भरलेले असते जे तुमच्या शरीराला निर्जलीकरणाशी लढण्यास मदत करू शकते. हे तुमचे शरीर हायड्रेट ठेवेल आणि त्वचा चमकदार बनवेल. थंड दूध पिण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी. तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर कच्चे थंड दूध देखील लावू शकता.
थंड आणि गरम दूध कोणत्याही प्रकारे पिणे फायदेशीर आहे. पण आपण ऋतूनुसार दूध प्यायले तर ते तुमच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)