मराठी बातम्या /बातम्या /देश /कोणी अमळनेरला माहेरी जात होतं, तर कोणी...; 13 मधील 5 जणं महाराष्ट्रातले; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता 

कोणी अमळनेरला माहेरी जात होतं, तर कोणी...; 13 मधील 5 जणं महाराष्ट्रातले; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता 

या बसमध्ये 40 ते 50 प्रवासी होते. तब्बल 13 लहान मुलं या बसमधून प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे.

या बसमध्ये 40 ते 50 प्रवासी होते. तब्बल 13 लहान मुलं या बसमधून प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे.

या बसमध्ये 40 ते 50 प्रवासी होते. तब्बल 13 लहान मुलं या बसमधून प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई, 18 जुलै : आज सकाळी इंदूरमधील (Indore Bus Accident) बातमीने अनेकांना धक्का बसला. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) इंदूरमधून निघालेली एसटी महामंडळाची बस तब्बल 40 प्रवाशांसह पुलावरुन खाली कोसळली. त्यावेळी पावसाचंही उधाण होतं. आणि पुलावरुन जाताना अख्ख्या बसने नर्मदेत जलसमाधी घेतली. जेव्हा या बसचा सांगाडा बाहेर काढण्यात आला तेव्हा ते दृश्य पाहून धक्काच बसला.

या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला आहे तर अजूनही 20 ते 25 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.  या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. आतापर्यंत आलेल्या मृतांमध्ये पाच जणं महाराष्ट्रातील असल्याचं समोर आलं आहे.

मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि पुलावरून बस नर्मदा नदीत कोसळली. वेगवान कारला ओव्हरटेक करत असताना कदाचित नियंत्रण सुटून बस कठड्याला धडकली, असं धर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बाळासाहेब खिस्ते यांनी सांगितलं. या बसमध्ये 50 ते 60 प्रवाशी असल्याचे सांगितले जात आहे.

मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि पुलावरून बस नर्मदा नदीत कोसळली.

आतापर्यंत 13 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तर 12 ते 15 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. अजूनही बचावकार्य सुरू आहे. तब्बल 13 लहान मुलं या बसमधून प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातातून 15 जणांना वाचवण्यात यश आले आहे. पूर्णक्षमतेनंही बस भरलेली होती. मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक प्रवाशी वाहून गेल्याची भीती वर्तवली जात आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अरवा मूर्तुजा बोहरी (वय 27, रा. मूर्तिजापूर, अकोला, अमळनेरच्या माहेरवाशीण), बस चालक चंद्रकांत एकनाथ पाटील (वय 45, रा. अमळनेर), बस वाहक प्रकाश श्रावण चौधरी (वय 40, रा. शारदा कॉलनी अमळनेर), निंबाजी आनंदा पाटील (वय 60, रा. पिळोदा, ता. अमळनेर),  कमला निंबाजी पाटील (वय ५५, रा पिलोदा ता. अमळनेर) हे सर्व चौघही अमळनेर तालुक्यातील रहिवासी आहे. अरवा मूर्तुजा बोहरी यांचं अमळनेरला माहेर आहे. त्यामुळे त्या इंदूरहून माहेरी जात असल्याचं सांगितलं जात आहे.

First published:

Tags: Accident, Madhya pradesh, Road accident