आणीबाणीची 44 वर्षे; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केला व्हिडीओ

fourt Four years of emergency : आणीबाणीला 44 वर्षे झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 25, 2019 11:25 AM IST

आणीबाणीची 44 वर्षे; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केला व्हिडीओ

नवी दिल्ली, 25 जून : आणीबाणी ! 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली. त्यानंतर देशातील वातावारण बदलून गेलं. लोकशाहीला नख लावण्याचा प्रकार म्हणून देखील आणीबाणीबद्दल बोललं जातं. शिवाय, इंदिरा गांधींच्या या निर्णयावर आज देखील सर्वच स्तरातून टिका केली जाते. आणीबाणीला आज अर्थात 25 जून रोजी 44 वर्षे पूर्ण होत आहेत. आणीबाणी विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाच्या अनेक मंत्र्यांनी ट्विट करत या घटनेचा निषेध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीच्या विरोधातील एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

Loading...

तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजकीय स्वार्थासाठी देशातील लोकशाहीची हत्या केली असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस असं ट्विट केलं आहे. इंदिरा गांधी यांच्या या निर्णयावर आज देखील जोरदार टिका केली जाते.

SPECIAL REPORT: आगीचा खेळ, अस्वलाचे हाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 25, 2019 11:24 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...