भारतीय लष्कराच्या धोकादायक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र 'अग्नी'चे सहा प्रकार आहेत. यातील सर्व प्रकार अण्वस्त्रे वाहून नेऊ शकतात. अग्नी-1 हे 900 ते 1200 किमी पर्यंत मारा करणारे मध्यम श्रेणीचं क्षेपणास्त्र आहे.
अग्नी-पी हे अग्नि-श्रेणी क्षेपणास्त्रांची प्रगत आवृत्ती आहे. त्याची मारक क्षमता 1000 ते 2000 किमी दरम्यान आहे.
जगातील सर्वात वेगवान उडणारे सुपरसॉनिक क्षेपणास्त्र ब्रह्मोसचे सात प्रकार आहेत. ते सर्व प्रकारची शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहेत. या क्षेपणास्त्राचा पल्ला 800 किमीपर्यंत वाढवण्यात यश आले आहे. लढाऊ विमानांद्वारे ते खूप उंचावरूनही सोडलं जाऊ शकतं.
25 फेब्रुवारी 1988 रोजी भारताने प्रथमच पृथ्वी क्षेपणास्त्राची (Prithvi Missile) यशस्वी चाचणी घेतली. भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. एजीपी अब्दुल कलाम यांची प्रमुख भूमिका होती. पृथ्वी-3 हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे कमी पल्ल्याचं क्षेपणास्त्र आहे. त्याची रेंज 350 ते 750 किमी आहे.
धनुष क्षेपणास्त्र भारतीय नौदलाने विकसित केलं आहे. ते पृष्ठभागापासून पृष्ठभागावर किंवा जहाजातून दुसऱ्या जहाजाला मारण्यास सक्षम आहे. हे क्षेपणास्त्र पृथ्वी-3 ची ही नौदल आवृत्ती आहे. ते पारंपारिक आणि अण्वस्त्रंदेखील वाहून नेऊ शकतं.
निर्भय क्षेपणास्त्र हे पारंपारिक आणि अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम सबसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. त्याची रेंज 1500 किलोमीटरपर्यंत आहे. ते भूपृष्ठभागावरून शत्रूच्या भूपृष्ठभागावर धडकतं.