मराठी बातम्या /बातम्या /देश /

भारतातील पहिली सी प्लेन सेवा; जाणून घ्या किती seaplane चं भाडं

भारतातील पहिली सी प्लेन सेवा; जाणून घ्या किती seaplane चं भाडं

पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंट ते केवडियामधील स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत (Statue of Unity)भारतातील पहिल्या सीप्लेन सेवेचं उद्घाटन केलं होतं. भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 145 व्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर 2020 रोजी हे उद्घाटन झालं.

पुढे वाचा ...
  • Published by:  Karishma Bhurke

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंट ते केवडिया अशी सुरू केलेली सी प्लेन सेवा (Seaplane Service)सुरू केली होती. मात्र सध्या काही कालावधीसाठी सी-प्लेन सेवा थांबवण्यात आली आहे. या सी-प्लेनच्या देखरेखीमध्ये काही अडचण असल्याने, ही सेवा थांबवण्यात आली आहे. ही सी प्लेन सेवा औपचारिकरित्या 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली होती. स्पाइसजेटच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मालदीवहून विमान परत आल्यानंतर 15 डिसेंबरपासून सीप्लेन सेवा पुन्हा सुरू होईल.

ही सेवा कधी सुरू झाली?

पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंट ते केवडियामधील स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत (Statue of Unity)भारतातील पहिल्या सीप्लेन सेवेचं उद्घाटन केलं होतं. भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 145 व्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर 2020 रोजी हे उद्घाटन झालं. साबरमती नदीतून हवेत झेपावून हे विमान केवडियातील नर्मदेच्या जलाशयात उतरतं.

सी-प्लेनचं भाडं किती आहे?

केवडिया आणि अहमदाबादमधील वॉटरड्रोमवर याच्या तिकिटांची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या एका व्यक्तीला यासाठी भाडे म्हणून किमान दीडशे रुपये द्यावे लागतील. त्याचं भाडे आरक्षित झालेल्या सीट्सच्या कोट्यानुसार निश्चित केलं जातं. त्याशिवाय जास्तीत जास्त भाडं प्रतिव्यक्ती 4800 रुपये ठेवण्यात आलं आहे.

(वाचा - घरबसल्या पैसे कमवण्याची नवी संधी; swiggy सोबत करता येणार हा व्यवसाय)

30 ऑक्टोबर 2020 पासून सेवा सुरू -

आतापर्यंत सुमारे 800 प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. येथे दररोज 2 सी-प्लेन्स चालवली जातात. त्याचं बुकिंग 30 ऑक्टोबर 2020 पासून सुरू झालं आहे. याचा कालावधी सुमारे 30 मिनिटं असतो.

(वाचा - धक्कादायक! IPL सट्टेबाजीला विरोध केल्यामुळे, आई आणि बहिणीची हत्या)

सी-प्लेन सेवा पुढे या मार्गांवर चालवली जाऊ शकते -

सध्या यामध्ये 16 सी प्लेन मार्गांचा समावेश करण्यात आला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, या सर्व मार्गांवर चाचणी घेण्यात आली आहे. त्यानंतर गुवाहाटी, अंदमान निकोबार आणि यमुना ते उत्तराखंडमधील टप्पर धरणासोबतच अनेक मार्गांवर नियमित सेवा देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे.

(वाचा - रेल्वे स्थानकांत केवळ कुल्हडमधूनच चहा मिळणार; रेल्वे मंत्र्यांची मोठी घोषणा)

भारतात पर्यटन वाढवण्यासाठी सुरू केलेल्या अनेक प्रकल्पांपैकी सी प्लेन सेवा हा एक प्रकल्प आहे. देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांच्या सोयी आणि सवलतीची काळजी घेण्यासाठी भारत सरकारने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.

First published:

Tags: Ahmedabad, Statue of unity