घरबसल्या पैसे कमवण्याची नवी संधी; swiggy सोबत करता येणार हा व्यवसाय

घरबसल्या पैसे कमवण्याची नवी संधी; swiggy सोबत करता येणार हा व्यवसाय

चविष्ठ जेवण बनवणारे, याद्वारे चांगली कमाई करू शकतात. ऑनलाईन खाण्या-पिण्याचा हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणतंही रेस्टॉरंट सुरू करण्याची गरज नाही की कोणत्याही गुंतवणूकीची गरज नाही. स्वादिष्ट जेवण बनवणं ही एकच अट या व्यवसायासाठी आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : जर तुम्ही घरबसल्या एखादा बिजनेस सुरू करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. या बिजनेसद्वारे घरबसल्या मोठी कमाई करता येऊ शकते. जर तुम्हाला जेवण बनवायला आवडत असेल, स्वादिष्ट जेवण बनवता येत असेल, तर तुम्ही रोज चांगली रक्कम कमावू शकता. या व्यवसायासाठी स्विगीने एका ऍपची सुरुवात केली आहे. 'स्विगी डेली' असं या ऍपचं नाव आहे. सामन्य घरात बनवलं जाणारं जेवण या ऍपद्वारे ग्राहकांपर्यंत पोहचवलं जाणार आहे.

चविष्ठ जेवण बनवणारे, याद्वारे चांगली कमाई करू शकतात. ऑनलाईन खाण्या-पिण्याचा हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणतंही रेस्टॉरंट सुरू करण्याची गरज नाही की कोणत्याही गुंतवणूकीची गरज नाही. स्वादिष्ट जेवण बनवणं ही एकच अट या व्यवसायासाठी आहे.

यासाठी काय करावं लागेल -

चांगलं जेवण घरीच बनवून ते स्विगीद्वारे ग्राहकांपर्यंत पोहचवता येणार आहे. 'स्विगी डेली'ने घरी बनवलेल्या या जेवणाची किंमत 50 ते 100 रुपयांपर्यंत ठेवली आहे. हे ऍप 3 दिवस, 7 दिवस किंवा संपूर्ण एक महिन्यासाठी सब्सक्राईब करता येणार आहे.

- 'स्विगी डेली'च्या मदतीने संघटित विक्रेते, घरगुती स्वयंपाकी आणि टिफिनची सेवा देणारे लोक घरी बनवलेलं जेवण वितरण करण्यास सक्षम होतील.

- 'स्विगी डेली' ऍप परवडणाऱ्या किंमतीत, लोकांची घराच्या जेवणाची गरज या सुविधेमुळे पूर्ण करतील. गुरुग्राममध्ये सुरू झालेल्या या सेवेचा येणाऱ्या महिन्यात इतर शहरांतही विस्तार केला जाणार आहे.

- 'स्विगी डेली' ऍपवर प्रत्येक प्रकारच्या जेवणासाठी 30 हून अधिक पर्याय उपलब्ध असतील. यात Homely, Lunchly, Fig, iDabba आणि Caloriesmart यांसारख्या संघटित विक्रेत्यांना सामिल केलं जाईल.

- त्याशिवाय, Dial a Meal आणि Dailymeals.in सारख्या लोकप्रिय टिफिन सेवांनाही यात सामिल करून घेतलं जाणार आहे. Sumita's Food Planet, Mrs. Ahmed's Kitchen आणि Shachi Jain अशा एक्सपर्ट होम शेफच्या पदार्थांचाही आस्वाद ग्राहकांना 'स्विगी डेली'द्वारे घेता येणार आहे.

दरम्यान, 2014 मध्ये सुरू झालेल्या Swiggy ने आतापर्यंत 100000 रेस्टॉरंट पार्टनर्ससह 175 शहरांत आपली सेवा दिली आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: November 30, 2020, 1:19 PM IST
Tags: foodswiggy

ताज्या बातम्या