अभिनव कुमार, प्रतिनिधी दरभंगा, 27 जुलै : अयोध्येत तयार होत असलेल्या राम मंदिराचं बांधकाम इतकं भक्कम करण्यात येतंय की, ते वर्षानुवर्षे जसंच्या तसं राहील. भूकंप, पूर, अशा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचा या मंदिराला तसूभरही धक्का लागणार नाही. मात्र तुम्हाला माहितीये का, अशाप्रकारचं हे भारतातलं पहिलं बांधकाम नाहीये. तर आपल्या देशात अशी बांधकामं यापूर्वीही झालेली आहेत. त्यातल्या सर्वात पहिल्या महालाविषयी आज आपण जाणून घेऊया. इसवी सन 1807मध्ये बिहारच्या दरभंगातील राजघराण्याचे 17वे महाराज छत्र सिंह यांनी भारतातला पहिला भूकंपरोधी महाल बांधला होता. 8 रिश्टर स्केल भूकंपापासूनही संरक्षित राहील इतकं भक्कम हे बांधकाम होतं. ‘नर्गोना पॅलेस’ असं या महालाचं नाव.
नर्गोना पॅलेसच्या ठिकाणी पूर्वी विद्यार्थ्यांसाठी एक घर होतं. हे घरदेखील छत्र सिंह यांनीच बांधलेलं. त्याकाळच्या इतर महालांपेक्षा हे घर अतिशय भक्कम होतं. मात्र 1934मध्ये आलेल्या भूकंपात ते क्षणार्धात वाहून गेलं. त्यानंतर छत्र सिंह यांनी व्हाइट हाऊस म्हणून ओळखला जाणारा नर्गोना पॅलेस बांधला. सचिन हनीट्रॅपमध्ये अडकला? PUBG आयडीतून सीमाचं नवं सत्य समोर! महत्वाचं म्हणजे दरभंगा महाराज हे त्याकाळात आधुनिक पद्धतीच्या वास्तू बांधायचे. हा महाल म्हणजे त्यांच्या कलाकृतीची अखेरची झलक असली, तरी त्यामुळे शिल्पकलेतील अनेक गोष्टी पहिल्यांदाच पाहायला मिळाल्या. देशात पहिल्यांदा काँक्रीटचा वापरही याच महालात झाला होता. काँक्रीटसह लोखंडाने नर्गोना पॅलेस बांधण्यात आलं. या बांधकामास इसवी सन 1934मध्ये सुरुवात झाली. त्यानंतर 7-8 वर्षांनी 22 खोल्यांचा हा महाल तयार झाला. 1934 पासून आजपर्यंत याठिकाणी कित्येक भूकंप झाले, मात्र हा महाल जागचा हललासुद्धा नाही.