नवी दिल्ली 20 मे: देशातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारताने 1 लाख बाधितांचा आकडा ओलांडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. कोरोनाग्रस्तांची 1 लाख संख्या असणाऱ्या जगातल्या 10 देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत होती. त्यावर आज केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने मोठा खुलासा केला आहे. संख्या वाढत असली तरी परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असून रुग्णांवर उपचार करण्याची पूर्ण क्षमता आपल्याकडे आहे असं आरोग्यमंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी आज सांगितलं. ते म्हणाले, अतिशय उच्च स्तरावर याची देखरेख केली जात आहे. कोरोनाला रोखण्यावर आमचा फोकस आहे. १० देशांमध्ये भारतापेक्षा जास्त केसेस आहेत. त्याच बरोबर इतर देशांमध्ये मृत्यूदरही जास्त आहे. कोरोना प्रभावित जगातल्या 15 देशांची लोकसंख्या ही 142 आहे. भारतात 1 लाख बाधित असताना जगाची संख्या ही 36 लाख आहे. भारताच्या लोकसंख्ये एवढी त्यांची संख्या असूनही त्या देशांमध्ये भारतापेक्षा 83 टक्के अधिक मृत्यू असल्याची माहितीही त्यांनी दिली. रुग्ण बरा होण्याचं प्रमाण हे 39.62 % आहे. ही अतिशय चांगली घटना असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू (corona patient deadbody) झाल्यानंतर त्याच्या मृतदेहातून व्हायरस पसरण्याच्या भीतीने अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करू दिले जात नाहीत. मात्र खरंच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या शरीरामार्फत व्हायरस पसरण्याचा धोका आहे का? मृतदेहामध्ये व्हायरस किती वेळ राहतो? याबाबत इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने (ICMR) महत्त्वाची माहिती दिली आहे. लॉकडाऊनमध्ये प्रसिद्ध व्यवसायिकाची गोळी घालून हत्या, अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO कोरोना रुग्णाच्या मृतदेहात व्हायरस हळूहळू कमी होतो, मात्र किती वेळात कमी होतो हे माहिती नाही, असं आयसीएमआरने म्हटलं आहे. त्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशा सूचनाही आयसीएमआरने दिल्यात. हे वाचा - कोरोनामुक्त रुग्ण पुन्हा कोरोनाग्रस्त झाल्यास त्याच्यामार्फत व्हायरस पसरतो का? मृतदेहातून कोरोनाव्हायरस कधी नष्ट होतो याबाबत आयसीएमआरला विचारणा करण्यात आली. त्यावेळी आयसीएमआरनं सांगितलं, कोरोना रुग्णाच्या मृत शरीरातून व्हायरस हळूहळू कमी होतो. मात्र त्यासाठी किती कालावधी लागतो, तो पूर्णपणे कधी नष्ट होतो याचा कालावधी निश्चित नाही. त्यामुळे मृतदेहाच्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी आवश्यक ती सर्व काळजी घ्यायला हवी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.