नवी दिल्ली, 05 सप्टेंबर: सध्या संपूर्ण जग कोरोनासारख्या (Corona Virus) महामारीचा सामना करत आहे. जगातलं कोरोनाचं संकट अद्याप गेलेलं नाही. संभाव्य तिसऱ्या लाटेचा (Third Wave) धोका पाहता, अनेक देशात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. त्यातच बऱ्याच देशात क्वारंटाईनचा (Quarantine) नियम लागू आहे. लसीकरण झाल्यानंतरही क्वारंटाईनचा नियम (Quarantine Rules) अनेक देशांनी लागू केला होता. भारतीयांनाही (Indian) बऱ्याच देशात गेल्यावर क्वारंटाईन व्हावं लागतं. मात्र आता काही देशांनी आपल्या क्वारंटाईनच्या नियमात बदल केला आहे. तुर्कीस्ताननं जाहीर केलं की, भारतातून आलेल्या प्रवाशांना आता 14 दिवस क्वारंटाईन होण्याची गरज नाही आहे. या घोषणेनुसार, भारतातून प्रवास करणारे किंवा गेल्या 14 दिवसात भारतात राहणारे 12 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या प्रवाशांचं लसीकरण झालेल्यांना या नियमातून सूट देण्यात येईल. भारतातील तुर्कीस्तान प्रजासत्ताकाच्या दूतावासाच्या संस्कृती आणि पर्यटन कार्यालयाने म्हटले आहे की, WHO किंवा तुर्की सरकारने मंजूर केलेल्या लसी घेतलेल्या प्रवाशांना या नियमातून सूट दिली आहे. डब्ल्यूएचओने मंजूर केलेल्या लसींच्या व्यतिरिक्त, तुर्की सरकारने मंजूर केलेल्या लसी म्हणजे फायझर बायोन्टेक, स्पुटनिक व्ही आणि सिनोवाक या आहेत. भारी राव! पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नंबर वन एका निवेदनानुसार, लोकांनी प्रवासाच्या तारखेच्या किमान 14 दिवस आधी दुसरा डोस घेतलेला असावा. ज्या भारतीय प्रवाशांचं कोविडशील्ड लसीकरण करण्यात आले आहे, त्या प्रवाशांनाही तुर्कीस्तानसाठी प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल. तसंच WHO नं कोवॅक्सिनलाही मंजुरी दिली की कोवॅक्सिन घेतलेल्या प्रवाशांना देखील तुर्कीस्तानला प्रवास करण्याची परवानगी मिळेल. ब्रिटेननं रेड लिस्टमधून केलं आऊट परिस्थिती सुधारल्यानंतर ब्रिटननंही भारताला प्रवास संदर्भातल्या रेड लिस्टमधून देशाचं नाव काढून एम्बर लिस्टमध्ये टाकलं आहे. एम्बर लिस्टमध्ये राहणाऱ्या देशातल्या प्रवाशांना 10 दिवसांसाठी क्वारंटाईन केलं जाऊ शकत नाही. दरम्यान त्यांना ब्रिटेनमध्ये पोहोचल्यानंतर दोन दिवसांच्या आता पुन्हा एकदा RTPCR चाचणी करावी लागते. जर्मनीतील भारतीयांवरील प्रवास करण्याची बंदी उठवण्यात आली आहे. जर्मनीनं भारताला विविध व्हेरिएंटच्या चिंता असलेल्या कॅटेगरीमधून काढून टाकलं आहे. प्रवाशांकडे कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट आणि 10 दिवस क्वारंटाईन होणं आवश्यक आहे. फक्त कोविडशील्डचे दोन्ही डोस घेतलेल्या भारतीयांना दक्षिण कोरियामध्ये प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे. यासोबतच 14 दिवसांचं क्वारंटाईन अनिवार्य असेल. तसंच कोवॅक्सिन घेतलेल्यांनाही क्वारंटाईन व्हावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.