जाहिरात
मराठी बातम्या / देश / प्रिन्स हॅरीने लग्नाचं आश्वासन पूर्ण केलं नाही म्हणत भारतीय महिलेची न्यायालयात धाव, वाचा पुढे काय घडलं?

प्रिन्स हॅरीने लग्नाचं आश्वासन पूर्ण केलं नाही म्हणत भारतीय महिलेची न्यायालयात धाव, वाचा पुढे काय घडलं?

प्रिन्स हॅरीने लग्नाचं आश्वासन पूर्ण केलं नाही म्हणत भारतीय महिलेची न्यायालयात धाव, वाचा पुढे काय घडलं?

प्रिन्स हॅरी यांनी लग्न न केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारी एक याचिका भारतीय महिलेने न्यायालयात केली होती.

  • -MIN READ trending-desk
  • Last Updated :

    लंडन, 14 एप्रिल: आपल्या सर्वांनाच सेलिब्रिटीज (Celebrities) आवडतात. आपण पडद्यावर एखाद्या देखण्या सेलिब्रिटीला पाहतो आणि मनात म्हणतो की, ‘एक दिवस मला या व्यक्तीशी लग्न करायचंआहे.’ लहानपणी वाटणारी ही ओढ, आवड मोठेपणी कमी होते. हळूहळू आपण या गोष्टी विसरूनही जातो. पण एक भारतीय महिला मात्र अशी आहे की, जी लहानपणीच्या या विचारातून बाहेरच पडली नाही आणि आता ती चक्क इंग्लंडचा राजपूत्र प्रिन्स हॅरी (UK Prince Harry) ला धमकी देत आहे. या महिलेनं प्रिन्स हॅरीनं आपल्याशी लग्न करण्याचे आश्वासन पूर्ण न केल्याबद्दल कायदेशीर कारवाई (Legal Action) करावी अशी मागणी करणारी याचिका (Petition) पंजाब आणि हरियाणामधील उच्च न्यायालयात दाखल केली आहे. अर्थातच पंजाब उच्च न्यायालयानं (Punjab High Court) ही याचिका फेटाळून लावली आहे. मंगळवारी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी झाली. या महिलेनं प्रिन्स हॅरीविरोधात अटक वॉरंट काढण्याची देखील मागणी केली होती. लाइव्ह लॉने दिलेल्या वृत्तानुसार, ही याचिकाकर्ता महिला स्वतः वकील आहे. तिचं नाव पलविंदर सिंगअसून, तिने स्वत: सुनावणीसाठी न्यायालयात हजेरी लावली होती. विशेष विनंती नंतर न्यायालयानं प्रत्यक्ष सुनावणीसाठीही हा खटला घेतला होता. लग्नाला विलंब होऊ नये यासाठी प्रिन्स हॅरी, ड्यूक ऑफ ससेक्स यांच्याविरूद्ध अटक वॉरंट काढावं अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली होती.

    जाहिरात

    हे पण वाचा:  प्रेग्नन्सीच्या आठव्या महिन्यात महिलेनं केली कमाल; VIDEO पाहून तोंडात बोटं घालाल या याचिकेवर निकाल देताना, न्यायमूर्ती अरविंदसिंग सांगवान म्हणाले, प्रिन्स हॅरीशी लग्न करण्याचं स्वप्न या शिवाय यात काहीच तथ्य नव्हते.’ ही याचिकेतील मसुदा अतिशय सुमार होता. यामध्ये प्रिन्स हॅरी यांनी पाठविलेल्या ईमेलचा उल्लेख करण्यात आला होता ज्यात त्यानं याचिकाकर्तीशी लवकरच लग्न करण्याचंआश्वासन दिलं होतं. मात्र याचिकाकर्तीनं कधी ब्रिटनचा दौरा केला आहे का, असं विचारलं असता, नकारार्थी उत्तर दिलं आणि त्या दोघांमधील सर्व संभाषण सोशल मीडियावर झाल्याचं सांगितलं, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं.

    ‘फेसबूक, ट्विटर सारख्या विविध सोशल मीडिया साइट्सवर बनावट आयडी तयार केले जातात. हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे तथाकथित प्रिन्स हॅरी हे पंजाबमधील एखाद्या खेड्यातील सायबर कॅफेमध्ये बसत असण्याची शक्यता आहे, याकडेही न्यायालयानं लक्ष वेधलं. बनावट संभाषण खरं असल्याचं मानून त्यावर विश्वास ठेवून त्याच विश्वात रमणाऱ्या याचिकाकर्तीबद्दल सहवेदना व्यक्त करत न्यायालयानंही याचिका फेटाळून लावली. याचिकाकर्तीबद्दल सहानुभूती दाखवण्या पलीकडे न्यायालय काहीही करू शकत नाही, असं न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात