नवी दिल्ली, 30 एप्रिल : नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) भारतीय विद्यार्थ्यांना पाकिस्तानमधील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश न घेण्याचा सल्ला दिला आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) आणि ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) यांनी काही दिवसांपूर्वी संयुक्त सल्लामसलत करून भारतीय विद्यार्थ्यांना पाकिस्तानमधील कोणत्याही महाविद्यालयात किंवा शैक्षणिक संस्थेत नावनोंदणी करू नये, असं आवाहन केलं होतं. त्यानंतर NMC सार्वजनिक नोटीस जारी केली आहे. यूजीसी आणि एआयसीटीईशी सल्लामसलत करून असं सांगण्यात आले की, जर विद्यार्थ्यांनी पाकिस्तानात वैद्यकीय शिक्षण घेतलं असेल तर ते या देशात नोकरी शोधण्यास किंवा उच्च शिक्षण घेण्यास पात्र ठरणार नाहीत. 29 एप्रिलला जारी करण्यात आलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, “सर्व संबंधितांना वैद्यकीय शिक्षणासाठी पाकिस्तानला न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे”. हे वाचा - ‘दसवी’! शाळा सोडली पण जिद्द नाही; 58 व्या वर्षी दहावीची परीक्षा देतायेत आमदार नोटीसमध्ये म्हटले आहे की, “भारतातील कोणताही नागरिक/परदेशी नागरिक ज्यांना पाकिस्तानमधील कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस/बीडीएस किंवा समकक्ष वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे, ते FMGE मध्ये उपस्थित राहण्यास किंवा भारतात नोकरी मिळविण्यास पात्र असणार नाही. डिसेंबर 2018 पूर्वी किंवा नंतर गृह मंत्रालयाकडून सुरक्षा मंजुरी मिळाल्यानंतर ज्यांनी पाकिस्तानच्या पदवी महाविद्यालये/संस्थांमध्ये नोंदणी केली होती, ते मात्र यासाठी पात्र असतील. हे वाचा - कोळशाची चणचण अन् देशभरातून विजेची रेकॉर्डब्रेक मागणी; काय आहे सध्याची स्थिती? फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन (FMGE) आणि नॅशनल एक्झिट टेस्ट (NEXT) ही विद्यार्थ्यांना भारतात सराव करण्यासाठी परवाना देणारी परीक्षा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.