मराठी बातम्या /बातम्या /देश /फ्लाईटमध्ये पुन्हा घृणास्पद कृत्य; 21 वर्षाच्या विद्यार्थ्याने शेजारच्या प्रवाशावर केली लघवी

फ्लाईटमध्ये पुन्हा घृणास्पद कृत्य; 21 वर्षाच्या विद्यार्थ्याने शेजारच्या प्रवाशावर केली लघवी

(Photo:AFP)

(Photo:AFP)

फ्लाईटमध्ये पुन्हा घृणास्पद कृत्य घडले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • New Delhi, India

नवी दिल्ली, 6 मार्च : न्यूयॉर्कहून नवी दिल्लीला येणाऱ्या अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये एका भारतीय प्रवाशाने शनिवारी मद्यधुंद अवस्थेत सहप्रवाशावर लघवी केली. आर्य वोहरा, असे 21 वर्षांच्या आरोपीचे नाव असून तो एका अमेरिकन विद्यापीठात शिकत आहे. तर या घटनेनंतर विमान कंपनीने यानंतर प्रवास करण्यास बंदी घातली आहे.

अमेरिकन एअरलाइन्सच्या निवेदनानुसार, जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणार्‍या फ्लाइट क्रमांक AA292 मध्ये हा तरुण मद्यधुंद अवस्थेत होता. रात्री 9.50 वाजता विमान उतरल्यानंतर या तरुणाला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.

अमेरिकन एअरलाइन्सने म्हटले आहे की, तरुण प्रवासी खूप मद्यधुंद होता आणि विमानातील क्रू सदस्यांच्या सूचनांचे पालन करत नव्हता. तो त्यांच्याशी वारंवार वाद घालत होता, बसायला तयार नव्हता आणि विमानाच्या सुरक्षिततेला सतत धोका देत होता. सहप्रवाशांची शांतता भंग करून शेवटी त्याने सीटवरच लघवी केली. या घटनेबाबत अमेरिकन एअरलाइन्सच्या पायलटने लँडिंगपूर्वी दिल्ली एटीसीशी संपर्क साधून सुरक्षेची मागणी केली.

त्याची माहिती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल-सीआयएसएफला देण्यात आली. विमानतळाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, विमान उतरल्यानंतर सीआयएसएफच्या जवानांनी मद्यधुंद तरुणाला विमानातून बाहेर काढले. सीआयएसएफच्या जवानांशीही त्याने गैरवर्तन केले. विमानतळ पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून प्रवाशाविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे.

24 वर्षांच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली 48 वर्षांची महिला, 4 मुलांची आई; पती म्हणाला...

दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आर्या वोहरा या अमेरिकन एअरलाइन्सच्या प्रवाशाविरुद्ध सहप्रवाशाला लघवी केल्याची तक्रार आम्हाला मिळाली आहे. वोहरा हा अमेरिकेतील विद्यार्थी असून दिल्लीतील डिफेन्स कॉलनीचा रहिवासी आहे. याप्रकरणी पोलीस आवश्यक ती कायदेशीर कारवाई करत आहेत.

दरम्यान, नोव्हेंबरमध्येही शंकर मिश्रा नावाच्या व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-नवी दिल्ली फ्लाइटच्या बिझनेस क्लासमध्ये एका 70 वर्षीय महिला सहप्रवाशावर लघवी केल्याचा आरोप आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती.

First published:
top videos

    Tags: Airplane, Airport, Delhi News, Travel by flight