नवी दिल्ली, 16 एप्रिल : दिल्ली मेट्रो (Delhi Metro) प्रमाणेच भारतीय रेल्वेच्या (Indian Railway) स्थानकांना (Railway Stations) खासगी कंपन्यांचे (Private Companies) नाव दिले जाऊ शकते. याबाबत अनेक सूचना रेल्वेकडे आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे आता आपल्या स्थानकांचे दर निश्चित करत आहे. वेगवेगळ्या श्रेणीतील स्थानकांसाठी वेगवेगळे दर ठेवण्यात येणार आहेत. ज्या स्थानकांची पायरी जास्त आहे, अशा स्थानकांची नावांसोबत जुळण्यासाठी खासगी कंपन्यांना अधिक पैसे खर्च करावे लागतील. हा खर्च प्रवासी आणि मालवाहतुकीच्या पावत्या वगळून विविध स्त्रोतांकडून मिळणाऱ्या उत्पन्नातून केला जाणार आहे. यापूर्वी लोकल ट्रेनमध्ये अनेक प्रकारच्या जाहिराती पाहायला मिळतात आणि अशा जाहिराती रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवरही पाहायला मिळतात. पण, रेल्वे स्टेशनचे नाव कोणत्याही खासगी कंपनीचे नाव जोडण्यासाठी हा पहिलाच प्रयत्न आहे. तथापि, मेल एक्सप्रेस रेल्वेमध्ये देखील जाहिरात दाखविण्याचा प्रयत्न आधीदेखील करण्यात आला होता. मात्र, तो यशस्वी झाला नाही. हेही वाचा - उत्तर काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे भयंकर कृत्य, इफ्तारसाठी घरी गेलेल्या सरपंचाची गोळ्या झाडून हत्या मेल एक्सप्रेस रेल्वे या जास्त वेगाने धावतात आणि त्यांना थांबेदेखील कमी असतात. यामुळे या रेल्वेंवर जाहिरात देणे फायदेशीर नसते. किती कंपन्या मोठ्या रेल्वे स्थानकांशी जोडण्यासाठी तयार आहेत? आणि त्या माध्यमातून किती कमाई केली जाऊ शकते, हे पाहावे लागणार आहे. रेल्वेचे खासगीकरण करण्यात येणार आहे, यासंबंधी अनेक बातम्या येत असतात. मात्र, रेल्वेचे खासगीकरण करता येणार नाही कारण ट्रॅक रेल्वेचे आहेत, इंजिन रेल्वेचे आहेत, स्टेशन्स आणि पॉवर लाईन रेल्वेचे आहेत. याशिवाय डबे आणि सिग्नल यंत्रणाही रेल्वेचीच आहे, असे मागच्याच महिन्यात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.