मराठी बातम्या /बातम्या /देश /महिलांना रेल्वेत मिळणार ‘ही’ खास सुविधा; जाणून घ्या अधिक माहिती

महिलांना रेल्वेत मिळणार ‘ही’ खास सुविधा; जाणून घ्या अधिक माहिती

indian railways

indian railways

महिला प्रवाशांना भारतीय रेल्वे प्रशासनाने (indian railways) एक खुशखबर दिली असून महिलांसाठी रेल्वेकडून एक खास सुविधा सुरू करण्यात आली आहे.

    नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर: महिला प्रवाशांना भारतीय रेल्वे प्रशासनाने (indian railways) एक खुशखबर दिली असून महिलांसाठी रेल्वेकडून एक खास सुविधा सुरू करण्यात आली आहे. यानुसार रेल्वे बर्थवरून  महिलांना होणा-या समस्येतून सुटका (women will get the special service in the indian railway) मिळणार आहे.

    रेल्वेकडून आता महिलांसाठी लोअर बर्थचा कोटा निश्चित करण्यात आला असून विविध कोचमध्ये महिलांसाठीच्या लोअर बर्थची संख्या निश्चित करण्यात आली आहे. याबाबत भारतीय रेल्वेकडून देण्यात आली आहे.

    भारतीय रेल्वेमध्ये महिलांना 'या' सुविधा मिळतात

    स्लिपर क्लास मेल एक्सप्रेस असलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये महिलांसाठी ६ बर्थ राखीव असतात. राजधानी, दुरांतोसारख्या एक्सप्रेस गाड्या आणि एसी गाड्यांमध्ये ही सुविधा मिळते. महिलांना वय, प्रवासी संख्या अशा बाबींच्या आधारे याचा लाभ मिळतो.

    स्लिपर क्लास (Sleeper Class) रेल्वेमध्ये महिलांसाठी ६ ते ७ लोअर बर्थ राखीव आहेत. एसी-3 मध्ये पाच आणि एसी-2 मध्ये चार खालच्या सीट्स महिलांना मिळू शकतात. ज्येष्ठ महिला आणि गर्भवती महिलांना ही सुविधा मिळते.

    ऑनलाईन पॅसेजर रिझर्व्हेशन सिस्टिमध्ये ज्येष्ठ नागरिक, 45 वर्षांवरील महिलांसाठी खालच्या सीट उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. एखाद्या महिलेनं तिकीट बुकिंग करताना नो चॉइस ऑप्शनवर क्लिक केलं असेल तर या सुविधेचा फायदा मिळू शकतो.

    प्रत्यक्ष तिकीट बुकिंग (Ticket Booking) करताना महिला, ज्येष्ठ नागरिक, मान्यताप्राप्त पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक यांच्यासाठी स्वतंत्र काउंटर असते.

    58 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना सर्व क्लासच्या तिकिटांवर 50 टक्के सवलत दिली जाते.

    काही वेळा ट्रेन सुरू झाल्यानंतर एखादी जागा रिकामी राहते. अशा वेळी मधला किंवा एकदम वरचा बर्थ मिळालेली महिला रिकाम्या लोअर बर्थची मागणी करू शकते. यासाठी टीसी (TC) सोबत संपर्क करून बदल करून घेता येऊ शकतो.

    युद्धामध्ये शहीद झालेल्या सैनिकांच्या पत्नींना ठराविक रेल्वेच्या भाड्यात ४५ टक्के सूट दिली जाते.

    जर एखाद्या महिलेला राष्ट्रपती पोलीस मेडल, इंडियन पोलीस अवॉर्ड मिळालेलं असेल तर तिला तिकीटाच्या रकमेमध्ये 60 टक्के सूट मिळते.

    अनेक उपनगरीय रेल्वेगाड्यांमध्ये (Suburban train) महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र डब्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

    वेटिंग रूममध्येसुद्धा महिलांसाठी वेगळी सोय केलेली असते.

    वरील सर्व सुविधा महिला प्रवाशांसाठी आहेत. याशिवाय ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांसाठीसुद्धा रेल्वेच्या खास सुविधा आहेत. तिकीट बुकिंगपूर्वी त्यांची नक्की माहिती घ्या, जेणे करून तुम्हाला रेल्वे प्रवासामध्ये आणखी लाभ मिळेल.

    First published:
    top videos

      Tags: Indian railway, Women, Women safety, Women security