ब्रिटनमधील सर्वात मोठी युद्धनौका, HMS Queen Elizabeth यामध्ये सामील होती. याशिवाय अत्याधुनिक पाणबुड्या आणि इतर युद्धसामुग्रीचा या संयुक्त सरावात समावेश होता.
ब्रिटनने इंडो-पॅसिफिकमधील आपले कार्यक्षेत्र वाढविण्यासाठी आणि त्या प्रदेशातील देशांशी संरक्षण संबंध प्रस्थापित करण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून हिंदी महासागरात हा युद्धसराव सुरू आहे,
21 ते 22 जुलै ला घेण्यात आलेल्या या संयुक्त युद्धअभ्यासात भारतीय नौदलातल्या INS सातपुडा, रणवीर, ज्योती, कवरत्ती आणि कुलीश या युद्धनौका आणि एक पाणबुडी यांचा समावेश होता.
ब्रिटनचे फर्स्ट सी लॉर्ड, अॅडमिरल टोनी रॅडकिन म्हणाले, 'हा महिना रॉयल नेव्ही आणि इंडियन नेव्ही एकत्र येऊन दोन महासागरामध्ये एकत्र काम करतील.' यात ब्रिटनचा कॅरियर स्ट्राइक ग्रुप पहिल्यांदाच येणार होता.