• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Pfizer लस अखेर 'या' महिन्यात भारताला मिळणार; सरकारची कंपनीबरोबर चर्चा सुरू

Pfizer लस अखेर 'या' महिन्यात भारताला मिळणार; सरकारची कंपनीबरोबर चर्चा सुरू

भारत सरकारची फायझर कंपनीसोबतची (Pfizer) चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच हा करार पूर्ण होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया (Health Minister Mansukh Mandaviya) यांनी दिली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 जुलै : देशातील कोरोनाची दुसरी लाट (Second wave of corona virus) ओसरत असली, तरी लसीकऱणाला मात्र अद्याप म्हणावा तसा वेग आलेला नाही. या पार्श्वभूमीवर भारत सरकार देशातील लसींचा पुरवठा (Supply of vaccines) वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं चित्र आहे. भारत सरकारची फायझर कंपनीसोबतची (Pfizer) चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच हा करार पूर्ण होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया (Health Minister Mansukh Mandaviya) यांनी दिली आहे. ऑगस्ट महिन्यापासून फायझरच्या लसींचा पुरवठा सुरु होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. देशातील 18 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला लशींचे दोन डोस देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून त्यावरून विरोधक करत राजकारण दुर्दैवी असल्याचं आरोयमंत्री मंडाविया यांनी म्हटलं आहे. तर देशातील कोरोना लसीकरणावर आतापर्यंत केंद्र सरकारनं 9725.15 कोटी खर्च केल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे. यामध्ये लशींच्या खरेदीची किंमत आणि ती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उभारण्यात आलेल्या यंत्रणेचा समावेश आहे. देशांतील कंपन्यांना ऍडव्हान्स देशात लशींचा तुडवडा भासू नये, यासाठी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लशींची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना अगोदरच ऍडव्हान्स देण्यात आल्याचं आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांनी सांगितलं आहे. सरकारनं लसी मिळवण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले असून ऑगस्ट ते डिसेंबरदम्यान देशात 135 कोटी लशी उपलब्ध होऊ शकतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. हे वाचा -गडकरींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प Delhi-Mumbai Expressway ने तोडले रेकॉर्ड फायझरची प्रतिक्रिया फायझर आपल्या लशींचा पुरवठा भारतात करण्यासाठी उत्सुक असून लवकरच भारत सरकारसोबतचा करार पूर्ण होईल, अशी अपेक्षा फायझर कंपनीचे सीईओ डॉ. अल्बर्ट बोर्ला यांनी व्यक्त केली आहे. भारतात तयार होणाऱ्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसी भारतातील लसीकरण मोहिमेचा मुख्य आधार असतील, हेदेखील डॉ. बोर्ला यांनी स्पष्ट केलं आहे.
  Published by:desk news
  First published: