अमेरिका - आतापर्यंत 1,64,610 नागरिकांना लागण आणि 3173 मृत्यू. जगात सर्वाधिक संसर्ग याच देशात झाले आहेत.
इटली - आतापर्यंत 1,01,739 लोकांना लागण आणि 11,591 मृत्यू. या देशाने कोरोनाचं सर्वांत धोकादायक रूप पाहिलं आहे. आतापर्यंत सर्वाधिक मृत्यूचं प्रमाण याच देशात आहे.
स्पेन - आतापर्यंत 94,417 जणांना लागण आणि 8,189मृत्यू. इटलीनंतर महाभयंकर कोरोना मृत्यूचं थैमान या देशात सुरू आहे.
चीन - आतापर्यंत 81,518 लोकांना लागण आणि 3,305मृत्यू. बहुतेक मृत्यू वुहानमध्ये झाले. देशाने ही साथ बऱ्यापैकी आटोक्यात आणली आहे.
इराण - आतापर्यंत 44,605 लोकांना लागण आणि 2,898 मृत्यू. मृत्यूचं प्रमाण जास्त असलेला एकमेव आशियायी देश.
युनायटेड किंगडम - आतापर्यंत 22,141 लोकांना लागण आणि 1,408 मृत्यू. पंतप्रधान, युवराज आणि आरोग्यमंत्र्यांनाही रोगाची लागण.
भारत - आतापर्यंत 1251 लोकांना लागण आणि 31 मृत्यू. लोकसंख्या आणि परिस्थिती लक्षात घेता वेगवान संसर्गाची सर्वाधिक शक्यता आपल्या देशात आहे.