जाहिरात
मराठी बातम्या / देश / अन्नपूर्णा पर्वतावरून बेपत्ता झाला भारतीय गिर्यारोहक, बचावकार्यात समोर आली महत्त्वाची अपडेट

अन्नपूर्णा पर्वतावरून बेपत्ता झाला भारतीय गिर्यारोहक, बचावकार्यात समोर आली महत्त्वाची अपडेट

ANURAG MALOO / TWITTER

ANURAG MALOO / TWITTER

एक साहसी, कठीण व अत्यंत कार्यक्षमतेचा खेळ म्हणून गिर्यारोहणास विशेष महत्त्व मिळालेलं आहे.

  • -MIN READ Trending Desk New Delhi,Delhi
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 20 एप्रिल : गेल्या आठवड्यात नेपाळमधील अन्नपूर्णा पर्वतावरून खाली उतरताना भारतीय गिर्यारोहक अनुराग मालू बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. तपास पथकाला अनुराग जिवंत सापडला आहे. अनुरागचा भाऊ सुधीरनं दिलेल्या माहितीनुसार, अनुराग जिवंत सापडला आहे. सध्या त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ‘एनडीटीव्ही’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. राजस्थानमधील किशनगड येथील रहिवासी 34 वर्षांचा अनुराग मालू गेल्या आठवड्यात अन्नपूर्णा पर्वतावर गिर्यारोहणासाठी निघाला होता. 17 एप्रिल रोजी तिसऱ्या कॅम्पवरून उतरताना तो सुमारे सहा हजार मीटरवरून खाली पडला. त्या दिवसापासून तो बेपत्ता होता. अन्नपूर्णा पर्वत हा जगातील दहाव्या क्रमांकाचा सर्वांत उंच पर्वत आहे. गिर्यारोहणासाठी सर्वांत धोकादायक असलेल्या पर्वतांमध्ये त्याचा समावेश होतो. युनायटेड नेशन्सची जागतिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि कृती करण्यासाठी सर्व सात खंडांमधील सर्वं 14 शिखरं आणि आठ हजार मीटरवरील सात सर्वोच्च बिंदूंवर चढाई करण्याची मोहीम अनुरागनं हाती घेतलेली आहे. त्याला आरईएक्स करम-वीर चक्रानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. शिवाय, तो भारताचा 2041 अंटार्क्टिक युवा राजदूतदेखील बनलेला आहे. दैनिक जागरणनं दिलेल्या वृत्तानुसार, अनुराग बेपत्ता झाल्यानंतर अजमेरचे खासदार भगीरथ चौधरी यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून शोधकार्याला गती देण्याची आणि नेपाळमधील दूतावासाला मदत देण्याची विनंती केली होती. मंगळवारी याच अन्नपूर्णा शिखरावरून बलजित कौर आणि अर्जुन बाजपेयी या दोन भारतीय गिर्यारोहकांचीही सुटका करण्यात आली होती. सेव्हन समिट ट्रेक्सचे सदस्य मिंग्मा शेर्पा यांनी एएनआयला सांगितलं की, अन्नपूर्णा पर्वतावरून अनुराग मालूला सुखरूप शोधून काढलं आहे. तो सध्या मणिपाल रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. एक साहसी, कठीण व अत्यंत कार्यक्षमतेचा खेळ म्हणून गिर्यारोहणास विशेष महत्त्व मिळालेलं आहे. अखिल भारतीय क्रीडा मंडळानंही गिर्यारोहणाला एक क्रीडाप्रकार म्हणून रीतसर मान्यता दिली आहे. गिर्यारोहणासाठी विशेष प्रशिक्षणाची, कुशलतेची व योग्य त्या साधनसामग्रीची आवश्यकता असते. या गोष्टींच्या अभावी गिर्यारोहण घातक ठरण्याचा शक्यता असते. मात्र, कधी-कधी सर्व काळजी घेऊनही गिर्यारोहकांचे अपघात होतात. चढाईदरम्यान काही गिर्यारोहकांनी आपला जीव गमावल्याच्याही घटना घडलेल्या आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: Nepal
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात