पाकच्या बॅट कमांडोंचा घुसखोरीचा कट भारतीय लष्कराने उधळला, पाहा VIDEO

पाकच्या बॅट कमांडोंचा घुसखोरीचा कट भारतीय लष्कराने उधळला, पाहा VIDEO

भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ 12 ते 13 सप्टेंबरच्या मध्यरात्रीचा आहे. ज्यात पाकिस्तान बॅट हाजीपूर सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा कसा प्रयत्न करीत आहे हे स्पष्ट दिसत आहे.

  • Share this:

जम्मू-काश्मीर, 18 सप्टेंबर : जम्मू-काश्मीरमधील घुसखोरीच्या प्रयत्नांवरून पाकिस्तान पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. भारतीय लष्कराने पुन्हा एकदा पाकिस्तानचा बॅटमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न उधळून लावला आहे. लष्कराकडून त्याचा एक व्हिडिओदेखील प्रसिद्ध करण्यात आला आहे.

भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ 12 ते 13 सप्टेंबरच्या मध्यरात्रीचा आहे. ज्यात पाकिस्तान बॅट हाजीपूर सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा कसा प्रयत्न करीत आहे हे स्पष्ट दिसत आहे. मात्र, भारतीय लष्कराने पाकिस्तानचा हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही आणि पाकिस्तानी बॅटला माघारी धाडलं. महत्त्वाचं म्हणजे ऑगस्टमध्ये नियंत्रण रेषेवरून पाकिस्तानकडून घुसखोरीचे 15 वेळा प्रयत्न झाले.

गुप्त माहितीनुसार, उत्तर काश्मीरच्या उंच भागात आणि जम्मूतील पुंछ आणि राजोरी भागात सीमेच्या पलीकडून घुसखोरीत वाढ झाली आहे. मात्र, सीमेपलिकडून दहशतवाद्यांच्या घुसखोरीबाबत सैन्याकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. नियंत्रण रेषेवरून घुसखोरीच्या यशस्वी आणि अयशस्वी प्रयत्नांविषयी जाणून घेण्यासाठी नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत काश्मीर भागातील गुरेझ, माचिल आणि गुलमर्ग सेक्टरमधील जम्मू प्रदेशातील पुंछ आणि राजोरी भागात उंच भागात अतिरेकी घुसखोरी करत असल्याचं सांगण्यात आलं आहे. यासाठी विविध एजन्सींनी एकत्रित केलेले पुरावे हाती लागले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

इतर बातम्या - उदयनराजेंच्या अडचणी वाढणार? राष्ट्रवादीचे 'हे' 4 दिग्गज आव्हान देण्याच्या तयारीत

जम्मू-काश्मीर पोलिसांचे महासंचालक दिलबाग सिंह म्हणाले होते की, नियंत्रण रेषेवर घुसखोरीचे अनेक प्रयत्न झाले. त्यातील बहूतेक प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी काश्मीरमध्येही शोध मोहीम राबवली जात आहे. विशेष म्हणजे 1990 च्या दशकात गुलमर्गमधील उंच भाग हे मध्य काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यासाठी वापरले जायचे.

SPECIAL REPORT: भुजबळ आणि राणेंच्या पक्ष प्रवेशावर भाजप सेनेतही चेकमेट!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2019 11:28 AM IST

ताज्या बातम्या