चीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला

चीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला

चीन फक्त कारणांचा शोध घेत असून कारण मिळालं की चिनी सैन्य थेट तैवानचाच ताबा घेईल अशी धमकीच ग्लोबल टाईम्समधून देण्यात आली आहे.

  • Share this:

बीजिंग18 सप्टेंबर: जगभरात चीन (China) विस्तारवादासाठी ओळखला जातो. त्यामुळे चीनवर कायम टीका केली जाते. चीनचा शेजारी देश असलेल्या तैवानवर (Taiwan) चीनचा कायम डोळा राहिला आहे. चीनच्या कम्युनिष्ट पक्षाचं मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’मधून तैवानला थेट युद्धाचीच धमकी देण्यात आली. चीन फक्त कारणांचा शोध घेत असून कारण मिळालं की चिनी सैन्य थेट तैवानचाच ताबा घेईल अशी धमकीच ग्लोबल टाईम्समधून देण्यात आली आहे.

तैवानला अमेरिका कायम पाठिंबा देत आला आहे. अमेरिकेचा कुठलाही नेता किंवा अधिकारी आला की चीन हा कायम धमकावत असतो. शुक्रवारी अमेरिकेचे एक ज्येष्ठ अधिकारी तैवानला आल्यानंतर चीनने आक्रमक भूमिका घेतली होती.

चिनच्या लढाऊ विमानांनी तैवानजवळ सकाळपासूनच घिरट्या घालायला सुरूवात केली. 18 चिनी विमानांनी आकाशात उड्डाण केलं होतं अशी माहिती तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

भारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन

काही दिवसांपूर्वीच तैवाननं चीनला इशारा दिली होता. तैवानचे (Taiwan) उपराष्ट्रपती लाई चिंग-ते (Lai Ching-te) यांनी चीनला मर्यादा ओलांडण्याची चूक न करण्याचा इशारा दिला होता. तैवानने स्पष्टपणे सांगितले आहे की, चिनी लढाऊ विमाने सीमेचे सतत उल्लंघन करीत आहेत आणि असेच सुरू राहिल्यास त्याचे परिणाम वाईट होतील. चिनी लढाऊ विमानांनी तैवान सीमेवर आतापर्यंत तीन वेळा घुसखोरी केली आहे.

चीनचा मुजोरपणा सुरूच, सीमेवर पुन्हा सैन्यांची जमवाजमव

तैवानचे उपराष्ट्रपती लाई चिंग-ते यांनी ट्वीट केले आहे की, "चीनने आज पुन्हा तैवानच्या एअर डिफेन्स विभागात आपल्या लढाऊ विमान उड्डाण केले. त्यांनी अशी चूक पुन्हा करू नये, तैवान शांतीप्रिय देश आहे मात्र आमच्या लोकांना वाचवण्यासाठी आम्ही काहीही करू". तैवानने म्हटले आहे की बुधवारी आणि गुरुवारी चिनी विमानांनी दोनदा त्यांच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केला.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 19, 2020, 4:55 PM IST

ताज्या बातम्या