नवी दिल्ली, 26 मार्च : गेल्या वर्षी जून महिन्यात लडाखच्या पेगॉंग सरोवर (Pangong Tso) परिसरातील गलवान खोऱ्यात (Galwan Valley) भारत आणि चीनच्या जवानांमध्ये चकमक (India China conflict) घडली होती. या चकमकीत भारताचे 20 जवान शहिद झाले होते. यानंतर दोन्ही देशात तणावाच वातावरण तयार झालं होतं. त्यामुळे दोन्ही देशाचे सैनिक पुढील कित्येक महिने एकमेकांसमोर ठाकले होते. पण सध्या दोन्ही देशाच्या सैन्यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे सीमेवरचा तणाव कमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यांचा एक व्हिडीओ (Indian army dance video) सोशल मीडियात व्हायरल होतं आहे. ज्यात भारतीय सैनिक पेगाँग सरोवर परिसरात आनंदाने नाचताना दिसत आहेत.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी हा व्हिडीओ त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय लष्कराचे काही जवान आंनदात नाचताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये, दोन भारतीय जवान डान्स करत आहेत. तर इतर जवान खुर्चीवर बसून संबंधित दोन जवानांचा आत्मविश्वास वाढवताना दिसत आहेत. यावेळी रिजिजू यांनी हा व्हिडीओ शेअर करताना आनंद व्यक्त केला आहे. तसंच जवानांच्या शौर्याचं कौतुक केलं आहे.
रिजिजू यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं की, 'जेव्हा जवान आनंद साजरा करत असतो, तेव्हा खूप चांगलं वाटतं.' त्यांनी पुढे सांगितलं की, संबंधित जवान हे भारतीय लष्करातील गोरखा बटालियनचे असून ते पेगाँग सरोवर परिसरात आनंदाने डान्स करत आहेत.
It feels great whenever soldiers enjoy! Brave Indian Army Gorkha Jawans and colleagues with full music at Pangong Tso in Ladakh. pic.twitter.com/d56Qjl3RhN
— Kiren Rijiju (@KirenRijiju) March 25, 2021
(वाचा - Indian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका...’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा!)
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतं आहे. तसंच अनेक नेटकऱ्यांनी चांगल्या प्रतिक्रियाही द्यायला सुरुवात केली आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी भारतीय सैनिकांना सलाम केला आहे. सुषमा त्यागी नावाच्या ट्वीटर युजरने लिहिलं की, 'हीच आपल्या देशाची गुणवत्ता आणि चांगुलपणा आहे, जी सर्वत्र दिसते. आपल्या सर्व जवानांना सलाम.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dance video, Indian army