जाहिरात
मराठी बातम्या / देश / प्लास्टिकच्या 'या' वस्तू असतील तर 2 दिवसात विल्हेवाट लावा, 1 जुलैपासून येतोय नवीन नियम

प्लास्टिकच्या 'या' वस्तू असतील तर 2 दिवसात विल्हेवाट लावा, 1 जुलैपासून येतोय नवीन नियम

प्लास्टिकच्या 'या' वस्तू असतील तर 2 दिवसात विल्हेवाट लावा, 1 जुलैपासून येतोय नवीन नियम

Single use plastic ban: 1 जुलैपासून देशात एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घालण्याची अधिसूचना जारी करण्यात आल्याची माहिती पर्यावरण मंत्रालयाने दिली आहे. आता फुगे, कानातील कळ्या, आईस्क्रीम, मिठाई आणि मिठाईच्या बॉक्समध्ये वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकच्या काड्या, सिगारेटची पाकिटे, निमंत्रण पत्रिका यांवरही बंदी घालण्यात येणार आहे.

    नवी दिल्ली, 28 जून : केंद्र सरकारने 1 जुलैपासून देशभरात सिंगल युज अर्थात एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. पर्यावरण मंत्रालयाने (Ministry of Environment) मंगळवारी (28 जून 22) या संदर्भात अधिसूचना जारी केल्याची माहिती दिली. सिंगल युज प्लास्टिकच्या (Single Use Plastic) वस्तू म्हणजे ज्या प्लास्टिकपासून बनवलेल्या असतात आणि एकदाच वापरुन त्या फेकून दिल्या जातात. म्हणजेच ज्या प्लास्टिकचा पुनर्वापर करता येत नाही अशा प्लास्टिकपासून तयार केलेल्या वस्तू. `एएनआय` या वृत्त संस्थेच्या वृत्तानुसार, सरकारचं म्हणणं आहे की, ज्या कमीवेळा वापरल्या जातात, मात्र कचरा जास्त होतो, अशा प्लास्टिकच्या वस्तूंचा प्रतिबंधित वस्तूंमध्ये समावेश आहे. पर्यावरण मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, 1 जुलै 2022 पासून सिंगल युज प्लास्टिकच्या वस्तूंचं उत्पादन, आयात, साठा, वितरण, विक्री आणि वापर यावर बंदी असेल. यात पॉलिस्टीरिन (Polystyrene) आणि विस्तारित पॉलिस्टीरिन वस्तुंचाही समावेश आहे. बंदी असलेल्या वस्तूंमध्ये फुगे, इअर बड, आईस्क्रिम कॅंडीमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या काड्यांचाही समावेश आहे. याशिवाय प्लास्टिकचे कप, ग्लास, चमचे, चाकू, स्ट्रॉ, 100 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचं प्लास्टिक आणि पीव्हीसीपासून तयार केलेले बॅनर यावरही बंदी घालण्यात येणार असल्याचं `मनी कंट्रोल`च्या वृत्तात म्हटलं आहे. तसंच बंदी घालण्यात आलेल्या वस्तूंच्या अधिसूचित यादीमध्ये मिठाईचे बॉक्स, सिगारेटची पाकिटं, निमंत्रण पत्रिकेवर लावण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या पातळ कागदाचा अर्थात फॉइलचा (Foil) समावेश आहे. पॅकेजिंग उद्योगात प्लास्टिक कागदाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. ओलाव्यामुळे वस्तू खराब होऊ नये, यासाठी या कागदाचा प्रामुख्याने वापर होतो. प्लास्टिकपासून बनवलेल्या काही वस्तूंवर यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरी बॅग (Carry bag), पिशव्यांच्या उत्पादन, आयात, साठवणूक, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2022 पासून 120 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरी बॅगवर बंदी घालण्याची तरतूददेखील या अधिसूचनेत आहे. Sugarcane Problem : साखर उद्योग अडचणीत येणार? पुढच्या हंगामात साखर उत्पादन वाढणार असल्याने साखरेचा प्रश्न गंभीर `एच टी`ने दिलेल्या माहितीनुसार, सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घालण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर नियंत्रण कक्ष (Control Room) स्थापन करण्यात येणार असल्याचं पर्यावरण मंत्रालयाने म्हटलं आहे. तसंच यासाठी विशेष अंमलबजावणी पथकं तयार केली जातील. ही पथकं बंदी घातलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंचं बेकायदेशीर उत्पादन, आयात, साठा, वितरण, विक्री आणि वापरावर लक्ष ठेवतील. या निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या सीमांवर चौक्या उभाराव्यात. जेणेकरुन या गोष्टी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यास प्रतिबंध करता येईल, असं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. सिंगल युज प्लास्टिकच्या वस्तूंमुळे केवळ पृथ्वीलाच नाही तर समुद्राच्या पर्यावरणालाही हानी पोहोचत आहे. याबाबत जगभरात चिंतेचं वातावरण आहे. सर्व देशांसाठी हे एक मोठं आव्हान बनलं आहे. या पार्श्वभूमीवर हे निर्बंध घालण्यात आले आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात