जाहिरात
मराठी बातम्या / देश / भ्रष्टाचारी देशांच्या यादीत भारताची कामगिरी गेल्या वर्षीपेक्षा निराशाजनक, हा देश ठरला सर्वोत्कृष्ट

भ्रष्टाचारी देशांच्या यादीत भारताची कामगिरी गेल्या वर्षीपेक्षा निराशाजनक, हा देश ठरला सर्वोत्कृष्ट

भ्रष्टाचारी देशांच्या यादीत भारताची कामगिरी गेल्या वर्षीपेक्षा निराशाजनक, हा देश ठरला सर्वोत्कृष्ट

भ्रष्टाचार हा जगभरापुढं संकट बनून उभा आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या एका (corruption perception index) क्रमवारीत भारत खाली फेकला गेला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 29 जानेवारी : ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल (Transparency International) या संस्थेनं नुकताच करप्शन पर्सेप्शन इंडेक्स (corruption perception index) जाहीर केला आहे. यात भारत 180 देशांमध्ये 86 व्या स्थानावर आहे. 2019 साली याच सर्व्हेमध्ये भारताचं (India) स्थान 180 देशांमध्ये 80 वं होतं. या करप्शन पर्सेप्शन इंडेक्समधून असं समोर आलं आहे, की जे देश कमी भ्रष्टाचारी (corrupt) आहेत, त्या देशांमध्ये कोरोनाच्या संकटाचा सामना अधिक चांगल्या रितीनं केला गेला. आणि या संकटातून संबंधित देशांचं आर्थिक नुकसानसुद्धा तुलनेनं कमी झालं. हा इंडेक्स जाहीर करणारी संस्था दरवर्षी जगातील भ्रष्ट देशांची रँकिंग अर्थात क्रमवारी जाहीर करते. यावर्षी ही क्रमवारी बनवताना कोरोनालाही ध्यानात घेतलं गेलं. या संस्थेच्या प्रमुख डेलिया फरेरिया रूबियो म्हणाल्या, की कोरोना हे केवळ आरोग्य (health0 आणि आर्थिक (economic) या बाबतीतलंच संकट नाही. हे भ्रष्टाचारविषयक संकटही आहे. आणि या बाबीला हाताळण्यात आपण अपयशी ठरतो आहोत. या क्रमवारीत भारताचं स्थान 86 वं आहे. चीन (china) 78 व्या, पाकिस्तान (Pakistan) 124 व्या आणि बांगलादेश 146 व्या स्थानावर आहे. यंदा न्यूझिलंड (New Zealand) पहिल्या क्रमांकावर आहे. तो सर्वात कमी भ्रष्टाचारी देश ठरला आहे. 100 पैकी 88 गुण या देशाला मिळाले आहेत. कोरोना नियंत्रणाबाबतही न्यूजीलँडचं कौतुक झालेलं आहे. यानंतर सिंगापूर, स्विझर्लंड आणि स्वीडन यांचे क्रमांक आहेत. त्यानंतर नॉर्वे आणि नेदरलँड यांचा क्रमांक आहे. अफगाणिस्तानला 165 वं स्थान मिळालेलं आहे मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत अफगाणिस्तान 11 क्रमांक वर आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात